लय भारी! पती आणि सासरच्यांनी दिली भक्कम साथ; 2 वर्षांच्या मुलाची आई झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:11 AM2023-07-12T11:11:26+5:302023-07-12T11:18:59+5:30
IAS Pushplata Yadav : सासर आणि नवऱ्याची साथ असेल तर मुली लग्नानंतरही घवघवीत यश मिळवू शकतात. आयएएस पुष्पलता यादव हे याचच उत्तम उदाहरण आहे.
लग्नानंतर बहुतेक मुलींचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अनेकदा ती करिअर सोडून कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबली जाते. पण सासर आणि नवऱ्याची साथ असेल तर मुली लग्नानंतरही घवघवीत यश मिळवू शकतात. आयएएस पुष्पलता यादव हे याचच उत्तम उदाहरण आहे. पुष्पलता यादव यांनी लग्नानंतर 2017 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा ऑल इंडिया 80 वी रँक आली आहे, पुष्पलता यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
IAS पुष्पलता यादव या मुळच्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण या गावातूनच झाले. त्यानंतर 2016 मध्ये बीएससी केली. यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एमबीएही केले. एमबीए केल्यानंतर पुष्पलता यादव यांनी आपल्या खर्चासाठी एका खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. खासगी क्षेत्रातील नोकरीसोबतच दोन वर्षे सरकारी नोकरीचीही तयारी केली. दोन वर्षांनी त्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये नोकरी मिळाल्यानंतर दोन वर्षांनी, 2011 मध्ये त्याचं लग्न झालं आणि त्या हरियाणातील मानेसर येथे राहायला गेल्या. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबादचा राजीनामा दिला आणि नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण वेळ दिला. मॅनेजरची नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
पुष्पलता यादव यांच्यावर आता दोन वर्षांच्या मुलाचीही जबाबदारी आहे. एका मुलाखतीत पुष्पलता सांगतात की त्यांने पाच वर्षे पुस्तकाला हातही लावला नव्हता. पण माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिले. पुष्पलता यांचा नवरा आणि इतर सासरच्या मंडळींनी पूर्ण पाठिंबा दिला. तयारी करत असताना नवरा मुलाला सांभाळायचा. पुष्पलता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायच्या. पहाटे चार वाजता उठायचा. यानंतर सहा ते सात वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. यानंतर मुलाला शाळेत पाठवून पुन्हा अभ्यास करत असे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.