प्रेरणादायी! वडील मेकॅनिक, आई आठवी पास, सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन 'ती' झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 04:29 PM2023-08-06T16:29:35+5:302023-08-06T16:44:51+5:30

रेना जमील य़ांचे वडील मेकॅनिक आहेत आणि आई आठवी पास आहे. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमाच्या शाळेतून घेतले आहे.

IAS Rena Jamil upsc exam cleared in 3rd attempt father mechanic mother 8th pass | प्रेरणादायी! वडील मेकॅनिक, आई आठवी पास, सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन 'ती' झाली IAS

प्रेरणादायी! वडील मेकॅनिक, आई आठवी पास, सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन 'ती' झाली IAS

googlenewsNext

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक आहे, म्हणून ती क्रॅक करणं ही मोठी गोष्ट मानली जातं. UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस-आयपीएस होण्याचे हजारो तरुणांचे स्वप्न आहे, दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देतात, त्यापैकी काहीच सर्व टप्पे पार करून आयएएस अधिकारी बनतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आता समोर आली आहे. वडील मेकॅनिक आणि आई आठवी पास असलेल्या मुलीने सरकारी शाळेतून शिक्षण घेतले आणि IAS झाली. IAS रेना जमील यांची यशोगाथा जाणून घेऊया….

रेना जमील या 2019 च्या बॅचची IAS अधिकारी आहेत. त्या झारखंडच्या धनबादमधील एका गावातील रहिवासी आहेत. कुटुंबात गरिबी आणि साधनांची कमतरता असतानाही रेना यांनी केवळ यूपीएससी परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर त्या यशस्वी आयएएस अधिकारीही झाल्या. रेना जमील य़ांचे वडील मेकॅनिक आहेत आणि आई आठवी पास आहे. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमाच्या शाळेतून घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांची आईही त्याच शाळेतून आठवी उत्तीर्ण झाली होती.

रेना जमील या इंटरमिजिएटपर्यंत एक सामान्य विद्यार्थी होत्या, पण पदवीनंतर त्यांनी मास्टर्समध्ये कॉलेजमध्ये टॉप केले. रेना यांनी जूलॉजी ऑनर्समध्ये मास्टर्स केले आहे, त्यानंतर त्यांना फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये करिअर करायचं होतं पण भावाच्या सांगण्यावरून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.  2014 मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली आणि परीक्षाही दिली. पहिल्या प्रयत्नात निवड झाली नाही, पण 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करण्यात यश मिळवले.

UPSC मध्ये 882 रँक मिळवून भारतीय माहिती सेवेत निवड झाली. यानंतर 2017 मध्ये तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, परंतु प्रिलिममध्येच अपयश आलं. 2018 मध्ये रेना यांनी काही दिवसांची सुट्टी घेतली आणि तयारी केली आणि UPSC उत्तीर्ण होऊन IAS होण्यास यशस्वी झाल्या, यावेळी तिला 380 रँक मिळाली होती. 2019 मध्ये, प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग बस्तर, छत्तीसगड येथे झाली, जिथे त्यांची असिस्टंट कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. यानंतर पुढच्या पोस्टिंगमध्ये एसडीएम झाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: IAS Rena Jamil upsc exam cleared in 3rd attempt father mechanic mother 8th pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.