प्रेरणादायी! कुटुंबीयांकडे पैसे नव्हते, मानली नाही हार; आधी इंजिनिअर, नंतर झाला IAS ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 18:38 IST2024-12-18T18:37:27+5:302024-12-18T18:38:03+5:30

IAS Sanjeev Kumar Maurya : यूपीएससी क्लिअर करणं हे अनेक मुलांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं रात्रंदिवस मेहनत करतात. संजीव कुमार मौर्य ८९ व्या रँकसह २०१८ मध्ये IAS झाले.

IAS Sanjeev Kumar Maurya journey engineering graduate success story | प्रेरणादायी! कुटुंबीयांकडे पैसे नव्हते, मानली नाही हार; आधी इंजिनिअर, नंतर झाला IAS ऑफिसर

प्रेरणादायी! कुटुंबीयांकडे पैसे नव्हते, मानली नाही हार; आधी इंजिनिअर, नंतर झाला IAS ऑफिसर

यूपीएससी क्लिअर करणं हे अनेक मुलांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं रात्रंदिवस मेहनत करतात. संजीव कुमार मौर्य ८९ व्या रँकसह २०१८ मध्ये IAS झाले. त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगही केलं आहे. UPSC उत्तीर्ण करणारे IAS संजीव कुमार मौर्य हे बरेली महापालिका आयुक्त आहेत. कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

"तुम्ही तुमच्या ध्येयाचा सतत पाठलाग करायला हवा. ते ध्येय, स्वप्न पूर्ण होईपर्यंत इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नये. स्वत:वर खूप संयम ठेवावा, जेणेकरून इतर गोष्टींमध्ये आपला वेळ वाया जाणार नाही. अभ्यासावरच फोकस करता येईल" असा सल्ला संजीव कुमार मौर्य यांनी दिला आहे. तसेच "माझ्या आई-वडिलांचं शिक्षण झालेलं नाही. पण कुटुंबात एक काका आहेत जे पदवी मिळवण्यासाठी घराबाहेर पडले."

"काकांनी अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. जे आता चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांनीच आम्हाला नागरी सेवा परीक्षा देण्याची प्रेरणा दिली. माझ्या मित्रांसोबतच माझ्या एका सीनियरचाही माझ्यावर प्रभाव पडला. या सर्वांमुळे मी नागरी सेवांच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केलं" असं संजीव कुमार मौर्य यांनी म्हटलं आहे. 

संजीव कुमार मौर्य हे त्यांच्या बॅचचे सर्वात हुशार आणि मेहनती विद्यार्थी होते. UPSC सारखी कठीण परीक्षा त्यांनी प्रचंड मेहनतीने उत्तीर्ण केली. आयएएस संजीव कुमार मौर्य म्हणतात की, संयमाने आणि दररोज अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. तयारी करताना सर्व कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. तुम्ही दररोज नीट अभ्यास करून UPSC पास करू शकता.

Web Title: IAS Sanjeev Kumar Maurya journey engineering graduate success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.