सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:52 PM2024-11-28T16:52:10+5:302024-11-28T16:54:20+5:30

आर्थिक परिस्थिती बेताची असूनही शिष्यवृत्तीच्या मदतीने दहावी पूर्ण केली.

ias savita pradhan married at age of 16 left in laws with children became ias after domestic violence | सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS

सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS

मध्य प्रदेशातील मंडई गावातील सविता प्रधान यांचं जीवन हे सुरुवातीपासूनच आव्हानांनी भरलेलं होतं. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही, त्यांनी शिष्यवृत्तीच्या मदतीने दहावी पूर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिली मुलगी ठरल्या. पुढील शिक्षणासाठी त्यांनी ७ किलोमीटर अंतरावरील शाळेत प्रवेश घेतला. त्याच्या आईने पार्टटाईम काम करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवला.

सविता या डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होत्या, पण शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचं लग्न एका श्रीमंत कुटुंबामध्ये ठरलं. कौटुंबिक दबावाखाली वयाच्या १६ व्या वर्षी लग्न केलं. लग्नानंतर त्यांचं आयुष्य हे आणखी कठीण झालं. पती आणि सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. कौटुंबिक हिंसाचार केला. पतीची मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे त्यांचं आयुष्य दु:खाने भरून गेलं होतं.

कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून सविता यांनी आत्महत्येचा विचार केला, पण मुलांकडे पाहून त्या थोड्या खंबीर झाल्या. केवळ २७०० रुपये घेऊन त्यांनी आपल्या दोन मुलांसह सासरचं घर सोडलं. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी ब्युटी पार्लर सुरू केलं आणि आपलं शिक्षण सुरू ठेवलं. त्यांनी भोपाळच्या बरकतुल्लाह विद्यापीठातून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये बीए केलं.

शिक्षण घेत असतानाच त्यांनी राज्य नागरी सेवा परीक्षेबद्दल ऐकलं आणि ती परीक्षा क्रॅक करण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम आणि जिद्दीने त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची मुख्य पालिका अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सविता यांच्या मेहनत आणि यशामुळे त्यांना प्रमोशन मिळालं. 

सविता आयएएस अधिकारी बनल्या आणि आज ग्वाल्हेर आणि चंबळ प्रदेशाच्या अर्बन एडमिनिस्ट्रेशनच्या जॉईंट डायरेक्टर आहेत. सविता यांनी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं. त्यांनी 'हिम्मत वाली लडकियां' नावाचे YouTube चॅनल सुरू केलं, जिथे त्या महिलांना प्रेरित करतात. त्यांचा संघर्ष, चिकाटी आणि यशाचं उत्तम उदाहरण आहे.
 

Web Title: ias savita pradhan married at age of 16 left in laws with children became ias after domestic violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.