IAS Smita Sabharwal: अपयश पचवून बनल्या IAS अधिकारी; 12वीचे मार्क बघून धक्काच बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:07 PM2024-08-26T17:07:30+5:302024-08-26T17:10:15+5:30
IAS Smita Sabharwal 12th Marksheet Viral: आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी त्यांची मार्कशीट शेअर केलीये.
IAS Smita Sabharwal Latest post: यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर स्मिता सभरवाल यांनी वयाच्या २३व्या वर्षीच या स्वप्नाला गवसणी घातली. तेलंगणा केडरच्या अधिकारी असलेल्या स्मिता सभरवाल यांच्याबद्दल हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांची १२वीची मार्कशीट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांना मिळालेले मार्क बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
2000 मध्ये स्मिता सभरवाल तेलंगणा केडरमधून आयएएस अधिकारी बनल्या. पहिले अपयश पचवल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केले. त्यावेळी त्या देशात चौथ्या आल्या होत्या.
12th Fail चा उल्लेख, स्मिता सभरवालांची पोस्ट काय?
IAS अधिकारी स्मिता सभरवाल यांनी एक पोस्ट केली आहे. IPS अधिकारी मनोज शर्मा यांच्या आयुष्यावरील 12th Fail चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"12th fail एक प्रेरणादायक होती. पण, बारावी परीक्षा पास होणे एक चांगली आठवण आहे. १२वीच्या निकालावर नजर टाकली आणि आठवले की, चांगले केल्याने मोठी स्वप्न बघण्याचा आत्मविश्वास मिळतो. सर्व प्रिय विद्यार्थ्यांना जे जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससीची तयारी करत आहेत. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क दोन्हींही आवश्यक आहे", असे त्यांनी म्हटले आहे.
IAS Smita Sabharwal 12th Marksheet: स्मिता सभरवाल यांना किती होते मार्क?
१९ जून १९७७ मध्ये दार्जिलिंगमध्ये जन्म झालेल्या स्मिता सभरवाल या कर्नल प्रणब दास यांची कन्या आहेत. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंब हैदराबादमध्ये स्थायिक झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये झाले. सिंकदराबादमधील सेंट एन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. १९९५ मध्ये १२वी परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना इंग्रजीमध्ये ९४, हिंदीमध्ये ९४, अर्थशास्त्रात ९०, स्ट्रक्चर ऑफ कॉमर्समध्ये ८६, प्रिन्सिपल ऑफ अकाऊंट्समध्ये ९७ इतके गुण मिळाले आहेत.
#12thfail was an inspiration!
— Smita Sabharwal (@SmitaSabharwal) February 9, 2024
But 12th Pass in flying colors is a sweet memory.
Chanced upon my 12th result and recalled that doing well gives one the insane confidence to dream big!
To all the dear kids who are prepping for #UPSC🇮🇳one of the toughest entrances in the world..… pic.twitter.com/R30mQZpH5u
पहिल्या प्रयत्नात अपयश, दुसऱ्या प्रयत्नात आयएएस
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत स्मिता सभरवाल यांना अपयश आले होते. दुसऱ्यांदा त्यांनी परीक्षा दिली आणि यशाला गवसणी घातली होती. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी चौथी रँक मिळवली होती.