कौतुकास्पद! नोकरी सोडली अन् परीक्षेची तयारी केली; भांडी विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:30 PM2023-02-20T12:30:49+5:302023-02-20T12:40:29+5:30

IAS Ravi Kumar : वडील एक छोटे भांडी दुकानदार आहेत आणि मुलगा रवी कुमार UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 38 व्या क्रमांकाने IAS अधिकारी झाला आहे.

ias success story father is shopkeeper son became IAS Ravi Kumar | कौतुकास्पद! नोकरी सोडली अन् परीक्षेची तयारी केली; भांडी विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS

कौतुकास्पद! नोकरी सोडली अन् परीक्षेची तयारी केली; भांडी विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS

googlenewsNext

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. देशाच्या विविध भागांतील तरुण या परीक्षेची तयारी करतात आणि त्यांचे नशीब आजमावतात, मात्र त्यापैकी मोजक्याच तरुणांना परीक्षेत यश मिळते. झारखंडमधील रवी कुमारची अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. वडील झारखंडमध्ये एक छोटे भांडी दुकानदार आहेत आणि मुलगा रवी कुमार UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 38 व्या क्रमांकाने IAS अधिकारी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा मूळचा झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील आहे. तेथून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर इंजिनीअरिंग तयारी केली. इंजिनीअरिंगची तयारी केल्यानंतर, त्याला आयएसएम धनबादमध्ये प्रवेश मिळाला, तेथून त्याने बीटेक मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. रवीने शिक्षणानंतर काही काळ टाटा मोटर्समध्ये काम केले. मात्र, आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

नोकरी सोडली आणि परीक्षेची तयारी सुरू केली

रवी कुमारने नोकरी सोडली आणि परीक्षेची तयारी सुरू केली. तयारीसाठी त्याने दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला, तिथून त्याने नीट तयारीला सुरुवात केली. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताना रवी कुमारने पहिलाच प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो परीक्षा पास करू शकला नाही. मात्र, त्याने हार न मानता दुसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू केली.

दुसऱ्या प्रयत्नात 38व्या क्रमांकासह आयएएस

रवी कुमारने दुसऱ्यांदा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या उणिवांवर काम करताना वाचनासोबतच उजळणीवरही भर दिला. त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्याने केवळ प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखतीत प्रवेश करून सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास केली नाही तर 38 व्या रँकसह आयएएस टॉपर देखील झाला. रवीचे वडील अजय साहा हे झारखंडमध्येच भांड्यांचे दुकानदार आहेत. भांड्यांच्या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: ias success story father is shopkeeper son became IAS Ravi Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.