भारीच! 2 वेळा नापास झाला, डिप्रेशनचा सामना केला पण नाही खचला; IAS होऊन घेतली यशस्वी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:32 PM2023-02-06T15:32:54+5:302023-02-06T15:40:35+5:30

शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या पॅकेजसह नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, त्यामुळे नोकरी सोडली आणि आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली.

ias success story shishir gupta became ias after failing twice know how he overcame depression | भारीच! 2 वेळा नापास झाला, डिप्रेशनचा सामना केला पण नाही खचला; IAS होऊन घेतली यशस्वी झेप

भारीच! 2 वेळा नापास झाला, डिप्रेशनचा सामना केला पण नाही खचला; IAS होऊन घेतली यशस्वी झेप

googlenewsNext

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या परीक्षेला बसतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. यात काही मोजकेच लोक यशस्वी होतात कारण या परीक्षेसाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. अशा परिस्थितीत यूपीएससीची तयारी करताना डिप्रेशनचा सामना करणाऱ्या एका तरुणाची गोष्ट आता समोर आली आहे. तरुणाने हार मानली नाही आणि डिप्रेशनला हरवून आयएएस झाला आहे. शिशिर गुप्ता असं या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. 

शिशिर यांचे वडील सरकारी शाळेत प्रिन्सिपल आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे राहणारे शिशिर गुप्ता यांनी जयपूरमधूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर जेईई मेन उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर जेईई एडव्हान्स्ड परीक्षा दिली आणि आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिशिर यांना मोठ्या पॅकेजसह अबू धाबीमध्ये नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, त्यामुळे नोकरी सोडली आणि आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली.

शिशिर 2016 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेला बसला होते आणि त्यात ते यशस्वी झाले होते. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वीच ते आजारी पडले. यामुळेच ते मेनमध्ये पास झाले नाहीत. दुसऱ्या प्रयत्नातही शिशिर यांनी सर्व स्तर पार केले, पण शेवटी सहा मार्कांनी राहिले. 2 वेळा नापास झाल्यानंतर शिशिर डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी लवकरच स्वत:ला नैराश्यातून सावरलं आणि 50 व्या रँकसह आयएएस बनून यश संपादन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: ias success story shishir gupta became ias after failing twice know how he overcame depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.