तलाकच्या अर्जानंतर IAS टीना डाबी यांनी लिहून सांगितल्या आपल्या भावना, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:04 PM2020-12-07T15:04:53+5:302020-12-07T15:07:18+5:30
टीना यांनी आयएस अधिकारी अतहर आमिर उल शफी खान यांच्यासोबत लग्न केले. नुकतीस आपसातील सहमतीने तलाक घेत अल्याचे त्यांचे वृत्त चर्चेत होते. (IAS Tina Dabi)
नवी दिल्ली - टीना डाबी या 2015मध्ये आयएएस परीक्षेत टॉप करून चर्चेत आल्या होत्या. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षीच आयएएस परीक्षेत टॉप केले होते. 2018मध्ये टीना यांनी आयएस अधिकारी अतहर आमिर उल शफी खान यांच्यासोबत लग्न केले होते. नुकतीस आपसातील सहमतीने तलाक घेत अल्याचे त्यांचे वृत्त चर्चेत होते. आता टीना डाबी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये टीना डाबी यांनी गेल्या काही दिवसांत वाचलेल्या पुस्तकांची माहिती दिली आहे.
टीना डाबी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, की - ही लेट पोस्ट आहे, गेल्या महिन्यात मी अनेक पुस्तकं वाचली. पुस्तकं वाचल्यानंतर मी माझे विचार एका कागदावर लिहिले आहेत. याच बरोबर मी यात असा भागही सामील केला आहे, जो मला सर्वात चांगला वाटला. आशा आहे, की आपणही हे वाचतांना तेवढाच आनंद घ्याल, जेवढा मी घेतला.
यापैकी आपण एखादे पुस्तक वाचले असेल तर आपणही समीक्षा शेअर करा. याशिवाय, आपल्याला इतर काही पुस्तकांची माहिती असेल, तर तीचेही स्वागत आहे.
टीना यांनी 'अ जेन्टलमन इन मॉस्को' पुस्तक वाचल्याचा उल्लेख करत म्हटले आहे, की या पुस्तकाने मला आतपर्यंत गदगदा हलवले. एक वाक्य आहे, की कुणीही व्यक्ती परिस्थितीवर प्रभूत्व मिळवत नाही, तर तो ते प्रभूत्व मिळविण्यास बांधील असतो.
याच बरोबर टीना डाबी यांनी त्यांनी वाचलेल्या सर्व पुस्तकाची यादिही टाकली आहे. यात, गुड वाइब्स, गुड लाईफ, अल्टिमेट ग्रँडमदर हॅक्स, देवदत्त पटनायक यांची हनुमान चालिसा, दोज डिलिशियस लेटर आदींचा समावेश आहे.