कौतुकास्पद! हार, मिठाई आणि कोर्ट फी; IAS अधिकाऱ्याने IPS सोबत फक्त 2 हजारांत केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:51 PM2023-08-25T14:51:10+5:302023-08-25T15:20:48+5:30
IAS अधिकारी युवराज मरमट आणि IPS अधिकारी पी. मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने केलेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
IAS अधिकारी युवराज मरमट आणि IPS अधिकारी पी. मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने केलेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कोर्ट मॅरेज करून अधिकारी जोडप्याने गेल्या आठवड्यात लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे मोठ्या पदावर बसलेल्या या जोडप्याने अवघ्या 2000 रुपयांमध्ये लग्न केलं आहे.
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात तैनात असलेले आयएएस अधिकारी युवराज मरमट यांनी तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी पी. मोनिकासोबत लग्न केलं आहे. कोर्ट रूममध्येच हार घालण्याचा कार्यक्रम झाला. साधेपणाने या जोडप्याने एकमेकांना हार घालून उपस्थित लोकांना मिठाई वाटली. या लग्नात दोन फुलांचे हार, मिठाई आणि कोर्ट फी असा एकूण 2 हजार रुपये खर्च करण्यात आला.
2021 मध्ये UPSC मध्ये निवड होण्यापूर्वी, युवराज मरकटची IIT BHU मध्ये देखील निवड झाली आहे. दुसरीकडे, आयपीएस अधिकारी पी. मोनिकाने पॅथलॉजीचा कोर्स केला आहे. इतकंच नाही तर फिटनेस, स्पोर्ट्ससोबतच तिला ब्युटी फॅशनमध्येही रस आहे. IAS अधिकारी युवराज मरकटची पहिली पोस्टिंग रायगडमध्ये झाली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेला युवराज नुकताच जिल्हा मुख्यालयात आला आहे. सर्वप्रथम त्याने त्याची गर्लफ्रेंड पी मोनिकासोबत कोर्ट मॅरेज करून सेटल होणं योग्य मानलं आहे. यानंतर, तो पुढील प्लॅन करत आहे. या कोर्ट मॅरेजनंतर पती-पत्नी दोघेही कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत आणि अचानक झालेल्या लग्नाबद्दल काहीही बोलले नाहीत.
दोघांनी प्रेमविवाह साधेपणाने केला. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आशीर्वादही दिले. यासोबतच सीईओ जिल्हा पंचायत जितेंदर यादव यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुश्री संतन देवी जांगडे यांच्या हस्ते लग्नाचं सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.