IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

By हेमंत बावकर | Published: October 21, 2020 02:54 PM2020-10-21T14:54:25+5:302020-10-21T14:58:07+5:30

IBPS Clerk Recruitment 2020: खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे.

IBPS Recruitment: Reopen in Government Banks; Most seats in Maharashtra | IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

googlenewsNext

IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकांमध्ये नोकरी (Sarkari Bank job) मिळविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लार्क पदांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. याद्वारे हजारो पदांवर जागा भरल्या जाणार आहेत. 


देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये 2557 जागांवर ही भरती केली जाणार आहे. खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. अर्ज आणि नोटिफिकेशनची लिंक खाली दिलेली आहे. 


पदाचे नाव - क्लार्क (क्लेरिकल कॅडर)
पदांची संख्या - 2557

कोणत्या राज्यात किती जागा?
उत्तर प्रदेश - 259 पद
उत्तराखंड - 30
राजस्थान - 68
मध्यप्रदेश - 104
बिहार - 95
छत्तीसगढ़ - 18
झारखंड - 67
दिल्ली - 93
महाराष्ट्र - 371
पश्चिम बंगाल - 151
पंजाब - 162
गुजरात - 139
चंदीगढ - 08
गोवा - 25
हिमाचल प्रदेश - 45
जम्मू-कश्मीर - 07
दादरा नगर हवेली / दमन दीव - 04
कर्नाटक - 221
केरळ - 120
लक्षद्वीप - 03
मणिपुर - 03
मेघालय - 01
मिझाराम - 01
नागालँड - 05
ओडिशा - 66
पद्दूचेरी - 04
आसाम - 24
सिक्किम - 01
तामिळनाडू - 229
तेलंगाना - 62
त्रिपुरा - 12
आंध्र प्रदेश - 85
अरुणाचल प्रदेश - 01

वय, शिक्षणाची अट
इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असायला हवा. त्याचे वय 6 नोव्हेंबर 2020 ला 20 ते 28 वर्षे असायला हवे. आरक्षणातील उमेदवारांना वयाची अट शिथिल असणार आहे. 


शुल्क
आयबीपीएसने काढचा आलेल्या या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे. यासाठी अर्जाची लिंक देण्यात आली आहे. यावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सामान्य, ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. 

पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार


महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु होण्याची तारीख - 23 ऑक्टोबर
  • बंद होण्याची तारीख 6 नोव्हेंबर
  • हॉल तिकिट मिळण्याची तारीख- 18 नोव्हेंबर
  • ऑनलाईन प्रिलिम्स परिक्षा - 5, 12, 13 डिसेंबर
  • प्रिलिम्स निकालाची घोषणा - 31 डिसेंबर 2020
  • ऑनलाईन मुख्य परिक्षा - 24 जानेवारी 2021 

 

भरतीची लिंक...
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRPClerksX.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576


पुन्हा सुरु करण्यात आलेली भरती इथे पहा...
https://www.ibps.in/wp-content/uploads/CRP_Clerks_Supplementary_Advt.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576


अर्ज करण्यासाठीची लिंक 23 ऑक्टोबरला सुरु होईल, यासाठी इथे क्लिक करा...
https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?_ga=2.215576863.943236444.1602902783-763477693.1584512576

Read in English

Web Title: IBPS Recruitment: Reopen in Government Banks; Most seats in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.