लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:01 PM2020-07-01T15:01:13+5:302020-07-01T15:49:44+5:30

IBPS RRB Recruitment 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे.

IBPS RRB Recruitment 2020: Bumper recruitment in rural banks; Apply via IBPS | लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे खासगी क्षेत्राची पुरती त्रेधा तिरपट उडाली आहे. हजारो लोकांना रोजगार बुडाल्याने आणि कोरोनाच्या भीतीने गावची वाट पकडावी लागली आहे. एकीकडे नोकऱ्या जात असताना विविध सरकारी बँकांसाठी नोकरभरती करणाऱ्या  IBPS ने बंपर भरती काढली आहे. 


IBPS RRB Recruitment 2020: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रियाही सुरु झाली आहे. योग्य उमेदवार या जागांसाठी 21 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये पीओ आणि क्लार्क पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. 


आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणर आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीनुसार यामध्ये यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बड़ौदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि छत्तीसगढ़ राज्य ग्रामीण बँकेसह अन्य राज्यांच्या बँकांचा समावेश आहे.  


पगार किती असेल? 
ऑफिस असिस्टंटला 7200 रुपये ते 19300 रुपये पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल - III (सीनियर मॅनेजर )- 25700 रुपये ते 31500 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल - II (मॅनेजर)- 19400 रुपये ते 28100 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल - I (असिस्ंटट मॅनेजर) - 14500 रुपये ते 25700 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. 


SBI देखील भरती करणार...
भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

Web Title: IBPS RRB Recruitment 2020: Bumper recruitment in rural banks; Apply via IBPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.