काश्मीरमध्ये अनेक  ठिकाणी बर्फवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:32 PM2017-11-15T22:32:36+5:302017-11-15T22:32:43+5:30

काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खोºयात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते. 

Ice in many places in Kashmir | काश्मीरमध्ये अनेक  ठिकाणी बर्फवृष्टी

काश्मीरमध्ये अनेक  ठिकाणी बर्फवृष्टी

Next
ठळक मुद्दे ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदुच्या वर राहिले.


श्रीनगर : काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खोºयात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते. 
मंगळवारी रात्री खोºयातील काही वरच्या भागांमध्ये नव्याने बर्फवृष्टी झाली, असे हवामान खात्याने सांगितले. उत्तर काश्मीरच्या गुलमर्ग (जिल्हा बारामुल्ला) येथील अफ्फारवात टेकड्यांवर बुधवारी सकाळी साडे आठवाजेपर्यंत तीन इंच बर्फवृष्टी झाली. मध्य काश्मीरच्या गंडेबरालसह सोनमर्ग आणि त्याच्या शेजारच्या भागांतही बर्फवृष्टी झाली. श्रीनगर आणि खोºयातील इतर सपाट भागांत मंगळवारी रात्री हलका पाऊस (२.२ मिलीमीटर) झाला. ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदुच्या वर राहिले. गुलमर्ग येथे तापमान उणे तीन अंश सेल्सियस होते. श्रीनगरमध्ये किमान तापमान २.२ अंश सेल्सियस नोंदले गेले ते त्या आधीच्या रात्री २.९ अंश सेल्सियस होते. दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग येथे २ अंश सेल्सियस तर जवळच्या काझीगुंड येथे ते २.१ सेल्सियस होते. दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे १.८ अंश सेल्सियस नोंदले गेले.
 

Web Title: Ice in many places in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.