काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी; काही भागांत पाऊ सही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:29 AM2017-11-16T00:29:33+5:302017-11-16T00:30:24+5:30
काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला.
श्रीनगर : काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते.
काही भागांमध्ये मंगळवारी रात्री खो-यातील नव्याने बर्फवृष्टी झाली आणि काही ठिकाणी ती सकाळपर्यंत सुरू होती. उत्तर काश्मीरच्या गुलमर्ग (जिल्हा बारामुल्ला) येथील अफ्फारवात टेकड्यांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन इंच बर्फवृष्टी झाली. मध्य काश्मीरच्या गंडेरबलसह सोनमर्ग आणि त्याच्या शेजारच्या भागांतही बर्फवृष्टी झाली.
श्रीनगर आणि खोºयातील इतर सपाट भागांत मंगळवारी रात्री हलका पाऊस (२.२ मिमी.) झाला. ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या वर राहिले. गुलमर्ग येथे तापमान उणे तीन अंश सेल्सिअस होते.
तापमान २ अंशांवर श्रीनगरमध्ये किमान तापमान
२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, ते त्या आधीच्या रात्री २.९ अंश सेल्सिअस होते. दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग येथे २ अंश सेल्सिअस तर जवळच्या काझीगुंड येथे ते २.१ सेल्सिअस होते. पहलगाम येथे १.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले.