बर्फाखालचा जवान ६ दिवसांनीही जिवंत

By admin | Published: February 10, 2016 04:21 AM2016-02-10T04:21:18+5:302016-02-10T04:21:18+5:30

उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार

Ice skies alive even after 6 days | बर्फाखालचा जवान ६ दिवसांनीही जिवंत

बर्फाखालचा जवान ६ दिवसांनीही जिवंत

Next

नवी दिल्ली : उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार घडला आहे. सर्वत्र बर्फच बर्फ पसरला असताना गाडल्या गेलेल्या अवस्थेत ते सहा दिवसांनंतर जिवंत सापडले.
सियाचीन ग्लेसियरमध्ये बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेला सोमवारी रात्री उशिरा सुदैवाने हनुमंतअप्पा यांच्या रूपाने आशेचा किरण गवसला. हनुमंतअप्पा यांना लगेच खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अँड रेफेरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. कमी रक्तदाब आणि धक्क्यामुळे ते कोमामध्ये आहेत, अशी माहिती सदर रुग्णालयाने बुलेटिनमध्ये दिली आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. उर्वरित सर्व जण मृत्युमुखी पडले असावेत, असे उत्तर लष्करी कमांडर लेप्ट. जन. डी.एस. हुडा यांनी दिले.
रात्रंदिवस सुरू होती मोहीम...
उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे हाडे गोठवणाऱ्या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालविली. बर्फ कापण्यासाठी कटर मशीनसह अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला. सोमवारी रात्री उशिरा बर्फ कापल्यानंतर या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. दरम्यान, हनुमंतअप्पा हे कोमात असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लष्करी रुग्णालयाने म्हटले आहे. हनुमंतअप्पा जीवित असणे हा आमच्या दृष्टीने पुनर्जन्मच असल्याची प्रतिक्रिया हनुमंतअप्पा यांच्या पत्नी महादेवी यांनी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मोदींनी घेतली भेट; दुर्दम्य धैर्याची प्रशंसा
लान्सनायक हनुमंतअप्पा यांना लष्कराच्या रुग्णालयात हलविल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने तेथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी प्रशंसा केली.

हनुमंतअप्पा यांच्या अचाट धैर्याची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. ते असामान्य जवान आहेत. डॉक्टरांचा चमू त्यांच्या प्रकृतीवर निगराणी ठेवत आहे.

ते लवकर बरे होतील अशी आशा असून आम्ही त्यासाठी प्रार्थना करीत आहोत असे मोदींनी टिष्ट्वटरवर म्हटले. हनुमंतअप्पा यांना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी आणखी एक टिष्ट्वट जारी करीत मोदी म्हणाले की, मी हनुमंतअप्पा यांना बघण्यासाठी जात आहे. संपूर्ण देशाची प्रार्थना सोबत आहे.

Web Title: Ice skies alive even after 6 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.