स्वदेशी कोरोना लसींबाबत खूशखबर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कधी मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:09 PM2020-08-21T15:09:46+5:302020-08-21T15:27:25+5:30
भारताला लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने आरोग्य मंत्रालय योजना आखत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्ली : जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर या वर्षाच्या अखेरीस भारतात कोरोना विषाणूची लस मिळेल. देशात तयार करण्यात आलेल्या आणि चाचणी सुरु असलेल्या दोन्ही कोरोनावरील लस डिसेंबर अखेरीस उपलब्ध होऊ शकतात, असा दावा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही लस वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकेल. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस वापरण्यासाठी तयार असेल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
भारतात तीन लसींवर काम सुरू
आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोनावरील अनेक लसींची चाचणी वेगाने घेतली जात आहे. स्वदेशी लसींची चाचणी वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोनावरील लस बाजारात येण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची आधीच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करीत आहे. उर्वरित दोन लसी तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीतकमी एक महिना अधिक वेळ लागू शकेल. वर्षाच्या अखेरीस या लसी उपलब्ध होतील, अशी शक्यता डॉ. हर्षवर्धन यांनी वर्तविली आहे.
तीन लसींबाबत लेटेस्ट अपडेट...
ऑक्सफोर्ड लस : भारतात मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत, असे सीरम इंस्टिट्यूटने म्हटले आहे. वर्षाच्या अखेरीस अॅस्ट्रॅजेनेका लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
कोवॅक्सिन: हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या या लसीची चाचणी दोन आठवड्यांपूर्वीही सुरू झाली आहे. ही लस वर्षाच्या अखेरीसही तयार होऊ शकते.
जायकोव्ह-डी: झायडस कॅडिलाने देखील मानवावर कोरोना लसची क्लिनिकल चाचणी करणे सुरू केले आहे. काही महिन्यांमध्ये ही चाचणीही पूर्ण होईल.
लस मिळवण्यासाठी काय आहे योजना?
भारताला लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने आरोग्य मंत्रालय योजना आखत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक भारत आहे. भारत जगातील लसींच्या गरजेच्या दोन तृतियांश इतका भाग निर्यात करतो,असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच, आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे की ही लस यशस्वी झाल्यास भारत सरकारला कमी दरात लस देण्यास प्राधान्य दिले जाईल. सीरम इंस्टिट्यूटसोबत असाच करार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
प्रथम लस कोणाला मिळेल?
आरोग्यसेवा (हेल्थकेअर) आणि अग्रभागी कामगारांना (फ्रंटलाइन वर्कर्स) सर्वात आधी लस उपलब्ध केली जाईल. त्यानंतर, ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेल्या रूग्णांना प्राधान्य देण्यात येईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
आणखी बातम्या...
आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन