मोठी बातमी! ICMR च्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल
By मोरेश्वर येरम | Published: December 18, 2020 09:11 PM2020-12-18T21:11:38+5:302020-12-18T21:29:04+5:30
बलराम भार्गव हे 'आयसीएमआर'च्या महासंचालकपदासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.
नवी दिल्ली
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीच्याएम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत बलराम भार्गव यांना दैनंदिन पातळीवर माध्यमांना माहिती देताना आपण पाहिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय भार्गव यांना १६ डिसेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती आता पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
ICMR DG (Prof) Balram Bhargava tests positive for COVID-19, admitted to AIIMS trauma centre in New Delhi.
— ANI (@ANI) December 18, 2020
बलराम भार्गव हे 'आयसीएमआर'च्या महासंचालकपदासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.