गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:28 AM2021-06-17T09:28:45+5:302021-06-17T09:32:53+5:30
Corona Virus : पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) एका स्टडीनुसार, कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा परिणाम गर्भवती आणि काही दिवसांपूर्वी मुलांना जन्म देणाऱ्या महिलांवर झाला. पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे. (icmr study pregnant postpartum women severely affected in second covid wave)
या स्टडीनुसार, गर्भवती महिला आणि मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या प्रकरणांची तुलना पहिल्या आणि दुसर्या कोरोना लाटेदरम्यान करण्यात आली. यानुसार, दुसर्या लाटेत लक्षणे आढळण्याची प्रकरणे जास्त होती, जी 28.7 टक्के होती. तर पहिल्या लाटेमध्ये ही आकडेवारी 14.2 टक्क्यांपर्यंत होती. तसेच, दुसर्या लाटेत मृत्यूचे प्रमाण 5.7 टक्के होते आणि पहिल्या कोरोनाच्या लाटेत ते फक्त 0.7 टक्के होते.
Comparative analysis of data collected from pregnant women and postpartum women during the first wave and the second wave of the COVID-19 pandemic @PregCovid registry India. @MOHFW_INDIA@DeptHealthRes@mygovindia@mygovMaha@COVIDNewsByMIB#ICMRFIGHTSCOVID19#IndiaFightsCOVID19pic.twitter.com/QfU2SvRazm
— ICMR (@ICMRDELHI) June 16, 2021
एकूण 1530 गर्भवती आणि मुलांना जन्म देणाऱ्या महिलांवर याबाबत स्टडी करण्यात आली. ज्यामध्ये 1143 पहिल्या लाटेत, तर दुसर्या लाटेत 387 महिलांचा समावेश होता. पहिल्या आणि दुसर्या लाटेत एकूण मृत्यू दर दोन टक्के होता, त्यापैकी बहुतेक कोविड निमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होणारी प्रकरणे होती.
स्टडीनुसार हे स्पष्ट झाले आहे की, या श्रेणीतील महिलांसाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. भारतात स्तनपान करणार्या महिलांना ही लस घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अद्याप सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. या मुद्द्यावर नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनिजेशनमध्ये चर्चा सुरू आहे.
भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली https://t.co/ylq55OTHt3 #coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतीच शिफारस केली आहे की गर्भवती महिलांना कोविडचा धोका जास्त असल्यास आणि त्यांना इतर आजार असल्यास लसीकरण करावे.