उत्तर प्रदेशातील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ICU मध्ये
By admin | Published: March 16, 2017 04:18 PM2017-03-16T16:18:59+5:302017-03-16T16:46:23+5:30
नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेले..
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेले उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांना प्रकृती अस्वस्थामुळे दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मौर्य यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दिवसभर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आहे. केशव प्रसाद मौर्य हे उत्तरप्रदेशात भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मौर्य हे भाजपाचा उत्तरप्रदेशातील प्रमुख ओबीसी चेहरा आहेत. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा आहे. मागच्या आठवडया विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यावेळी 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे तब्बल 324 आमदार निवडून आले.