ईडीने जप्त केली १२ हजार कोटींची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:10 AM2017-07-31T02:10:18+5:302017-07-31T02:10:22+5:30

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.

idainae-japata-kaelai-12-hajaara-kaotaincai-sanpatatai | ईडीने जप्त केली १२ हजार कोटींची संपत्ती

ईडीने जप्त केली १२ हजार कोटींची संपत्ती

googlenewsNext

सुरेश भटेवरा ।
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.
संसदेत शुक्रवारी एका प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नमूद केले की, गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या करदात्यांवर अस्थायी अथवा तात्पुरते जप्ती आदेश जारी केल्यानंतर ईडीने ११,0३२.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आर्थिक वर्ष २00५ ते २0१५ च्या दरम्यान जप्त केलेली संपत्ती जवळपास ९ हजार कोटींची आहे. ईडीने चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ९६५.८४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चुकीच्या मार्गाने पैसे कमवल्याची माहिती प्राप्त होताच धाडी घाला व आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश ईडीच्या उच्चपदस्थांनी आपल्या अधिकाºयांना दिले आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आयकर विभाग, सीबीआय व सक्तवसुली संचलनालयात पुरेपूर समन्वय राहिल, याची काळजी सर्व विभागांनी घेतली आहे.
केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानेही बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी याच काळात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली. ही समिती तीनही यंत्रणांच्या संपर्कात आहे. ज्या बनावट कंपन्यांनी विविध मार्गाने परदेशात परस्पर पैसे पाठवले, त्यांच्या विरोधातही ईडीने कारवाई चालवली आहे. एप्रिल २0१७ मधे चेन्नईच्या एका ३६ वर्षीय तरुणाला ईडीने अटक केली. या तरूणाने आपल्या ६ बोगस कंपन्यांव्दारे ७८ कोटींची रक्कम परदेशात पाठवली होती.

Web Title: idainae-japata-kaelai-12-hajaara-kaotaincai-sanpatatai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.