जिओला टक्कर देण्यासाठी "डेटा जॅकपॉट"ची आयडिया
By admin | Published: April 9, 2017 10:24 AM2017-04-09T10:24:23+5:302017-04-09T10:36:28+5:30
डेटा जॅकपॉट प्लॅननुसार आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना 100 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा मिळणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - जिओच्या नवनव्या ऑफर्समुळे टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर दिवसेंदिवस वाढत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आयडियानं नवा डेटा जॅकपॉट प्लॅन लाँच केला आहे. या डेटा जॅकपॉट प्लॅननुसार आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना 100 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा मिळणार आहे.
आयडियानं "डेटा जॅकपॉट" प्लॅननुसार ग्राहकांना 100 रुपयांत प्रतिमहिना 10 जीबीच्या डेटाची ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार तीन महिन्यांपर्यंत प्रतिमहिना 10 जीबी डेटा मिळवता येणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये बदल होणार असून, आतापर्यंत 1 जीबीसाठी मोजावे लागणा-या पैशात तुम्हाला 10 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या ऑफरनुसार तीन महिन्यांनंतर तुम्हाला 100 रुपयांच्या रिचार्जवर प्रतिमहिना 1 जीबीच डेटा मिळणार आहे. मात्र कंपनीनं आम्ही वेळोवेळी आमच्या ऑफरमध्ये बदल करणार असल्याचं सांगितलं आहे.
तत्पूर्वी रिलायन्स जिओनं प्राइम मेंबरशिप घेण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली होती. तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या आदेशानंतर जिओवर ही ऑफर मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. ज्या ग्राहकांनी जिओ समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याआधी प्राइम मेंबरशिप घेतली आहे, अशा ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप
सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.