आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ

By Admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:50+5:302015-03-24T23:50:09+5:30

बुधवारी पुरस्कार वितरण, सायंकाळी उशिरा केली घोषणा

The ideal Anganwadi worker's helper awards | आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ

आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ

googlenewsNext

बुधवारी पुरस्कार वितरण, सायंकाळी उशिरा केली घोषणा
नाशिक : आदर्श ग्रामसेवक व उत्कृष्ट अभियंता पुरस्कारापाठोपाठ आता आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचा घोळ पुरस्कार वितरणाच्या पूर्वसंध्येपर्यंत सुरूच असल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरा ७८ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
बुधवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता या पुरस्कारांचे वितरण तिडके कॉलनी येथील ग्रामसेवक भवन येथे अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आदर्श अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी तीन हजार, तर आदर्श अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, आदर्श पर्यवेक्षिका यांना केवळ सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी सांगितले. आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका प्रत्येकी २६ असे एकूण ७८ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांची निवड करण्यासाठी १०० गुणांचा निकष ठेवण्यात आला होता. त्याचे गुणदान त्या त्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी देऊन निवड केलेल्या आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका निवडीवर सभापती शोभा सुरेश डोखळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी शिक्कामोर्तब केले असले, तरी ही निवड पुरस्कार वितरण करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होती. सायंकाळी उशिरा या निवड केलेल्या ७८ कर्मचार्‍यांच्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची स्वाक्षरी घेण्यात आल्याने निवडीचा घोळ सुरूच असल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)

Web Title: The ideal Anganwadi worker's helper awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.