सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारे धोके वेळीच ओळखावे : अंजुषा चौघुले
By admin | Published: March 6, 2016 11:38 PM2016-03-06T23:38:22+5:302016-03-06T23:43:11+5:30
महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम
महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम
नाशिक : महिलांना स्वसंरक्षणासाठी ज्युदो कराटे येणे आवश्यक नसून आत्मविश्वास, सामान्यज्ञान, अंतर्शक्ती यांची आवश्यकता असून समाजात महिलांचे सबलीकरण होणे आवश्यक असल्याचे मत अंजुषा चौघुले यांनी रविवारी (दि.६) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या तर्फे महिलादिना निमित्त अयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
महिलांना संबोधित करतांना त्यांनी महिलांनी सतत शिकत रहाणे आवश्यक असून इतर समाजाचे उतरदायित्व ओळखून समाजातील महिलांमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण वास्तव जीवन विसरत चाललो असून सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारे धोके वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे अधोरेखीत केले. यावेळी अंजुषा चौघुले यांनी महिला विशीष्ट अडचणीत सापडल्यावर त्यांनी काय काळजी या बाबत काही टिपा देखील दिल्या.
कायदेविषयक जनजागृती यावर बोलतांना ॲड. इंद्रायणी पटणी यांनी मानसिक, अर्थिक, सामाजिक, सबलीकरणासाठी कोणते कायदे येणे आवश्यक आहे तसेच लैंगिक शोषण आणि नाते संबंधातुन स्त्रीयांची होणारी पिळवणूक, चार भितींच्या आतला छळ याबाबत सुचना करण्यापेक्षा प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे अधोरेखीत केले.
महाराष्ट्र चेंबर्सच्या बाबुभाई राठी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, आमदार सीमा हिरे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रज्ञा पाटील तर आभार सोनक दगडे यांनी मानले. (प्रतिनिधी)