राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:14 PM2023-09-13T12:14:11+5:302023-09-13T12:15:01+5:30
मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत.
अयोध्या - अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही घोषित केलीय. दुसरीकडे श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राच्या माध्यमातून युद्धपातळीवर मंदिराचे काम पूर्ण होत आहे. ट्रस्टचे महासचिव संपत राय यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, मंदिराच्या खोदकामावेळी काही प्राचीन मंदिरांचे अवशेष मिळाले असून त्यात मूर्ती व स्तंभ यांचा समावेश आहे. राय यांनी एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये हे आढळून आलेले प्राचीन मूर्तींचे अवशेष एकत्र ठेवल्याचं दिसून येत आहे.
मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत. ज्यामध्ये, डझनभरापेक्षा जास्त मूर्ती, स्तंभ आणि शिलालेख आहेत. या शिलालेखात देवी-देवतांच्या कलाकृती असून फोटोत मंदिरात उभारण्यात येणारे स्तंभही पाहायला मिळत आहेत. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी हे सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेष ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
श्री रामजन्मभूमि पर खुदाई में मिले प्राचीन मंदिर के अवशेष। इसमें अनेकों मूर्तियाँ और स्तंभ शामिल हैं। pic.twitter.com/eCBPOtqE1W
— Champat Rai (@ChampatRaiVHP) September 12, 2023
मंदिर बनवण्यासाठीचं खोदकाम सुरू झाल्यानंतर ४० ते ५० फूट खोदकाम होताच, या मूर्ती व अवशेष आढळून आले होते. मंदिर परिसरातील खोदकाम करताना ह्या सर्व वस्तू आढळून आल्या आहेत. हिंदूंचा या जागेवरील दावा त्यामुळे अधिक दृढ होतो. ASI सर्वेक्षणातूनही अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. मंदिर-मस्जीद प्रकरणी कोर्टातील सुनावणीदरम्यान न्यायालयानेही या बाबी विचारात घेतल्या आहेत.