बाबरी मशिदीच्या खांबांवर आढळल्या देवांच्या मूर्ती, सर्वोच्च न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:48 AM2019-08-17T04:48:02+5:302019-08-17T04:48:32+5:30
अयोध्येत उद््ध्वस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने अॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
नवी दिल्ली : अयोध्येत उद््ध्वस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने अॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
बाबरी मशिदीच्या वास्तंूची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालात ही माहिती असल्याचे वैद्यनाथन यांनी सांगितले. या अहवालातील काही उतारे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखविले. न्यायालयाने नेमलेल्या अधिकाºयाने बाबरी मशिदीची १६ एप्रिल १९५० रोजी पाहणी केली होती. या मशिदीच्या खांबांवर शंकराची मूर्ती व शिल्पे असल्याचे त्याने आपल्या अहवालात नमूद केले होते. या निरीक्षणातून बाबरी मशिदीच्या आधी तिथे मंदिरच असल्याचे सिद्ध होते, असेही वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
या मशिदीच्या खांबांवर हिंदू देवतेच्या आढळून आलेल्या मूर्तींची छायाचित्रे व नकाशा रामलल्ला विराजमान या पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. कोणत्याही मशिदीवर अशा प्रकारची शिल्पे नसतात, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.
वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सोमवार ते शुक्रवार दैनंदिन सुनावणी सुरू आहे.
मुस्लिमांचा हक्कच नाही
बाबरी मशिदीच्या ठिकाणी मुस्लिम नमाज पढत असले तरी त्या एकाच कारणावरून ती जागा त्यांची होऊ शकत नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी मुस्लिम नमाज पढतात म्हणून ते रस्ते काही त्यांच्या मालकीचे होत नाहीत.
बाबरी मशिदीच्या आधी तिथे मंदिर होते हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या जागेवर मुस्लिमांचा हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही, असा युक्तिवाद रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.