Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:12 PM2020-06-24T19:12:08+5:302020-06-24T19:17:46+5:30
लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे IES अधिकाऱ्याला शोधण्यासाठी काम सुरु आहे.
भारत - चीन सीमेवर सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावर पाहणी करणाऱ्यास गेलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी सुभान अली यांच्या जिप्सीचा अपघात होऊन सुमारे ५ हजार फूट खोल खड्ड्यात कोसळली. लष्कराच्या अधिकाऱ्यांना त्यांची जिप्सी सापडली आहे. मात्र, अद्याप सुभान अली यांचा पत्ता लागलेला नाही. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे IES अधिकाऱ्याला शोधण्यासाठी काम सुरु आहे.
सुभान अली हे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील कौवापूर कस्बा परिसरातील जयनगरा गावचे रहिवासी आहेत. सुभान यांचे प्राथमिक शिक्षण जिल्ह्यातील रमईडीह आदर्श विद्या मंदिर येथून पूर्ण झालं आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांची सिव्हिल इंजिनिअर पदी लडाख येथे नियुक्ती करण्यात आली. जयनगरा गावच्या रमजान अली यांचा २८ वर्षीय मुलगा सुभान अलीने सहा महिन्यापूर्वी लोकसेवा आयोगाची भारतीय इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सुभानने वडिलांचे नाव उंचविले होते. भारत-चीन सीमेवर रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांची जिप्सी अनियंत्रित झाली आणि सुमारे पाच हजार फूट खोल खड्ड्यात पडली, लाईव्ह हिंदुस्थानने असे वृत्त दिले आहे.
सुभान अली नेहमी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या कुटूंबियांशी बोलत असत. भारत आणि चीनमधील वादामुळे सुभानबद्दलही कुटुंबीय चिंतेत होते. सुभानचा भाऊ शाबान म्हणाला की, सोमवारी त्याला भावाचा फोन आला नाही. तसेच फोन करूनही भावाशी संपर्क होत नव्हता. शेवटी शाबान याने मंगळवारी सुभानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली.
२७ जुलै रोजी सुभानचे लग्न होणार होते
कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IES सुभानच्या लग्नाची तारीख जुलैमध्ये निश्चित करण्यात आली होती. लग्नाची तयारी घरीच केली जात होती. भाई शाबान म्हणाला की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच्या लग्नाची तारीख निश्चित केली होती. पण लॉकडाऊनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली.
कपडे शिवून मुलाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी केले तयार
इंजिनीअरिंगच्या पदावर लद्दाखच्या सीमेवर संरक्षण मंत्रालयाने पदभार सोपवलेल्या सुभान अली यांचे वडील कापड शिवणकाम करतात. शिवणकाम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयार केले. त्याला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. मुलाने वडिलांच्या संघर्षाला यश मिळवून देत परीक्षेत सा वा रँक मिळवून त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
India China Border वर IES अधिकारी बेपत्ता, पुढल्या महिन्यात लग्न असल्याने घरात होती लगीनघाई pic.twitter.com/pXw4FLhb1e
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
भाजपाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती
बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण
धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा
Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं