लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:48 AM2020-07-18T11:48:24+5:302020-07-18T11:49:55+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही.

ies officer shubhan ali missing from leh family alleged on central government | लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

Next

नवी दिल्लीः भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) अधिकारी सुभान अली 22 जूनपासून बेपत्ता झाले आहेत. ते सीमा रस्ते संघटनेत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची तैनाती लेह आणि कारगिलमध्ये करण्यात आली होती. 22 जून रोजी ते लान्सनायक पलविंदर सिंग यांच्यासमवेत भारत-चीन सीमेवर बांधल्या जात असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी  गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत त्यांचा मृतदेहसुद्धा सापडलेला नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत.
 
उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी सुभानचे कुटुंब खूपच अस्वस्थ आहे. ते प्रत्येक क्षणी भयंकर यातनांमधून जात आहेत. सुभान या जगात नाही, यावर त्यांचा विश्वास नाही. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असेल तर सरकारने त्यांचा मृतदेह आणावा, जेणेकरून आमच्या लोकांना खात्री पटेल, असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ते जिवंत किंवा त्यांचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत ते जिवंत असल्याचंच आम्ही समजू.

सरकारच्या प्रयत्नांनी असमाधानी
सुभानचे वडील रमझान अली यांनी आरोप केला की, सरकार सुभानला शोधण्यासाठी पुरेसे उपाय करीत नाही. केंद्र सरकारच्या प्रयत्नावर ते समाधानी नाहीत. या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रमजान अली म्हणतात की, जोपर्यंत ते आपल्या मुलाला जिवंत किंवा मृतदेह पाहत नाही, तोपर्यंत त्याचा श्वास अडकलेल्या अवस्थेत राहील. 

भावानं एनडीआरएफवर उपस्थित केले प्रश्न
सुभानचा भाऊ शबन अली यांनी सांगितले की, सैन्य आणि लेह प्रशासन एकत्रितपणे 60 किमीच्या परिघात आपल्या भावाचा मृतदेह शोधू शकलेले नाहीत. ते म्हणाले की, जेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते लेह येथे गेले होते. एनडीआरएफच्या अधिका-यांची तिथे भेट घेतली. अधिका -यांनी त्यांना सांगितले की, अतिशीत तापमानात त्यांचा मृतदेह पाण्यात सापडणे फार कठीण जात आहे. एनडीआरएफ कठीण काळात काम करू शकत नसेल तर त्यांचा काय उपयोग?, असंही ते म्हणाले आहेत. 

सुभान अली कोण आहेत?
बलरामपूरमधील जयनगर या छोट्याशा गावात राहणारे सुभान यांनी आयआयटी दिल्लीमधून इंजिनीअरिंग केले. IES प्रवेश परीक्षेत त्यांना भारतात 24वे स्थान मिळाले. 2018 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये एमटेक केले. त्यांना दिल्ली विकास प्राधिकरणात पोस्ट करण्यात आले होते. एप्रिलमध्ये त्यांना कारगिल भागात पाठवण्यात आले होते. ते येथील भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या बांधकामांचे काम पाहात होते.

हेही वाचा

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

Web Title: ies officer shubhan ali missing from leh family alleged on central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.