26/11ची पुनरावृत्ती झाल्यास संयम राखणार नाही
By admin | Published: June 11, 2014 01:15 AM2014-06-11T01:15:14+5:302014-06-11T01:15:14+5:30
मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली.
Next
>मुंबई हल्ला : तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिलरी क्लिंटन यांना स्पष्टच सांगितले होते
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली.
क्लिंटन यांनी ही माहिती ‘हॉर्ड चॉईसेस’ या त्यांच्या नव्या पुस्तकामध्ये दिली आहे. 2क्क्8 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला होता. क्लिंटन तेव्हा अमेरिकी परराष्ट्रमंत्री होत्या. या हल्ल्यानंतर क्लिंटन यांची तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेत उभय नेत्यांनी दुसरा हल्ला झाल्यास आपणाकडून संयमाची अपेक्षा बाळगू नये, असे आपणास स्पष्ट सांगितले होते, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्यानंतर सिंग यांनी पाकबाबत संयम दाखविणो किती कठीण बनले आहे, हे मला सांगितले होते.
पाकस्थित लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2क्क्8 ला मुंबईतील अनेक ठिकाणी घातक हल्ला केला होता. यात 166 जण ठार झाले होते. मृतांत पाच अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. भारतीय या हल्ल्याला 26/11 असे संबोधतात. हा एक प्रकारे 9/11चा प्रतिध्वनी आहे. 9/11ला अमेरिकेत हल्ला होऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती भुईसपाट झाल्या होत्या. मुंबई हल्ल्यादरम्यान हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली होती. भारतीय नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मी मुंबईतील याच हॉटेलमध्ये वास्तव्य केले, असे क्लिंटन यांनी या पुस्तकात लिहिले आहे. हे पुस्तक मंगळवारी बाजारात उपलब्ध होत आहे. (वृत्तसंस्था)
‘आयएसआय’मुळे लादेनविरोधी मोहिमेची पाकला माहिती दिली नव्हती
-वॉशिंग्टन : पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमधील काहीजणांचे अल-काईदा व तालिबानशी संबंध असल्याचे ठाऊक असल्याने अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या आपल्या गुप्त मोहिमेची माहिती पाक सरकारला दिली नव्हती, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
-आमचे पाकसोबतचे संबंध आधीच खूप खराब झाले होते. पाक लष्कर आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांत बसले नसते. त्यामुळे पाकला सांगूनच ही मोहीम राबवावी जेणोकरून पुढील संभाव्य अनर्थ टळू शकेल, असाही एक मतप्रवाह होता. त्याचबरोबर पाकला न सांगता जर मोहीम राबवली तर संबंध एकदम तुटतील व त्याचा आपल्या अफगाण युद्धावर परिणाम होईल, असेही म्हटले जात होते. मात्र, आम्ही हा धोका पत्करला व अबोटाबादमध्ये लादेनला ठार मारले.