अखिलेश, मायावती एकत्र आल्यास 2019ची लोकसभा जिंकू- लालूप्रसाद यादव
By admin | Published: July 5, 2017 08:41 PM2017-07-05T20:41:10+5:302017-07-05T20:41:10+5:30
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि मायावती यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. जर अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले, 2019ची लोकसभा निवडणूक नक्कीच जिंकू, असा विश्वास लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला.
अखिलेश यादव आणि मायावती हे 2019च्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. दोघेही एकत्र आल्यास 2019मध्ये भाजपचा खेळ समाप्त होईल, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी भाजपावरही टीका केली. प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि त्यांचे कुटुंबीयांना भाजपा सरकार विनाकारण टार्गेट करत आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाचे मायावती हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. हे दोघे एकत्र आल्यास भाजप समाप्त होईल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.
आणखी वाचा
(नरेंद्र मोदी हे कलियुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)