आझाद असली तर, दयेची भीक मागणारे सावरकर नकली - काँग्रेस

By admin | Published: March 7, 2016 01:04 PM2016-03-07T13:04:50+5:302016-03-07T15:28:21+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते अशी उघड टिप्पणी काँग्रेसने केली असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत

If Azad is there, then Savarkar fake who is begging for mercy - Congress | आझाद असली तर, दयेची भीक मागणारे सावरकर नकली - काँग्रेस

आझाद असली तर, दयेची भीक मागणारे सावरकर नकली - काँग्रेस

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते अशी उघड टिप्पणी काँग्रेसने त्यांच्या टि्वटर अकाउंटवर केली असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ज्यावेळी चंद्रशेखर आझाद भारतासाठी प्राणांची आहुती देत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते असे या टि्वटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
असली लिहिलेला आझाद यांचा फोटो व नकली लिहिलेला सावरकरांचा फोटो एकत्र करून टि्वटरवर पोस्ट करण्यात आला असून आझाद यांचं कौतुक करताना 'आखरी दम तक लडे प्राणोंकी आहुती दी' असं म्हटलं आहे. तर सावरकरांवर टिका करताना 'अंग्रेजोंसे 6 बार रहम की भीक मांगी' असं म्हटलं आहे.
सावरकरांनी तुरुंगात असताना केलेला दयेचा अर्ज यापूर्वीही अनेकवेळा वादविवादाचा विषय झालेला आहे. सावरकरांची बाजू घेणाऱ्यांनी हा धोरणात्मक निर्णय असे म्हटले तर सावरकर विरोधकांनी हा पुळपुटेपणा असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या खूनाच्या आखणीमध्ये सावरकरांचा सहभाग होता, असा काहींचा आरोप आहे, तर सावरकरांना याप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आल्याचे सावरकरवादी दाखवतात.
मात्र, आत्तापर्यंत चर्चांमध्ये असलेल्या या मुद्याने काँग्रेसच्या व्हेरीफाइड टि्वटर अकाउंटवर स्थान मिळवले असून सावरकरांना नकली व ब्रिटिशांकडे दयेची भीक मागणारे असे संबोधल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: If Azad is there, then Savarkar fake who is begging for mercy - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.