नाेटाबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का संपला नाही?; प्रियांका गांधींचा सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:13 AM2021-11-09T08:13:00+5:302021-11-09T08:13:12+5:30
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाहीर केलेल्या नाेटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नाेटाबंदीच्या निर्णयावरून काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाहीर केलेल्या नाेटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नाेटाबंदीच्या निर्णयावरून काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केेंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे.
ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी माेदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. नाेटाबंदी यशस्वी झाली असेल तर भ्रष्टाचार का संपला नाही? काळा पैसा परत का आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? दहशतवादावर प्रहार का केला नाही? महागाई नियंत्रणात का आली नाही, असे प्रश्न त्यांनी केले आहेत.
इंधन दरकपातीवरूनही केंद्र सरकारची खिल्ली
उत्पादन शुल्कात कपात करून इंधनाचे दर कमी केल्यावरून प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडविली. हा निर्णय मनापासून नव्हे तर भीतीपाेटी घेतल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे.