जवानांचे शिरच्छेद केल्यास पाकला चोख प्रत्युत्तर देऊ - लष्करप्रमुख सुहाग

By Admin | Published: August 1, 2014 11:12 AM2014-08-01T11:12:16+5:302014-08-01T11:12:26+5:30

भविष्यात पाकिस्तानकडून भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्याची घडल्यास पाकला चोख आणि तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराने भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी दिला आहे.

If the beheaded by the soldiers, then give a good answer - Army Chief Suhag | जवानांचे शिरच्छेद केल्यास पाकला चोख प्रत्युत्तर देऊ - लष्करप्रमुख सुहाग

जवानांचे शिरच्छेद केल्यास पाकला चोख प्रत्युत्तर देऊ - लष्करप्रमुख सुहाग

googlenewsNext

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - भविष्यात पाकिस्तानकडून भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्याची घडल्यास पाकला चोख आणि तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराने भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी दिला आहे. 
जनरल बिक्रम सिंग यांच्या निवृत्तीनंतर दलबीरसिंह सुहाग यांनी शुक्रवारी लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. पहिल्या दिवशी सैन्याकडून मानवंदना स्वीकारल्यावर सुहाग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये पाकने भारतीय जवानाचे शिरच्छेद केल्याची घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडल्यास तुम्ही काय कराल असा प्रश्न सुहाग यांना विचारण्यात आला. यावर सुहाग म्हणाले, भविष्यात पाकने पुन्हा असे कृत्य केल्यास त्यांना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल. भारतीय सैन्याच्या आधूनिकीकरण, मूलभूत सेवांची निर्मिती, मनुष्य बळाचा योग्य वापर आणि सैन्यातील जवानांना अत्याधूनिक शस्त्रास्त्र मिळावे याकडे माझा कल राहील असे सुहाग यांनी सांगितले. 

Web Title: If the beheaded by the soldiers, then give a good answer - Army Chief Suhag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.