सायकल गेली तर मोटारसायकल!

By admin | Published: January 4, 2017 02:36 AM2017-01-04T02:36:19+5:302017-01-04T02:36:19+5:30

उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांनी पक्षाच्या ‘सायकल’या निवडणुक चिन्हावर दावा केला असला तरी या वादाचा

If the bike goes motorcycle! | सायकल गेली तर मोटारसायकल!

सायकल गेली तर मोटारसायकल!

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षातील मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांनी पक्षाच्या ‘सायकल’या निवडणुक चिन्हावर दावा केला असला तरी या वादाचा फैसला होईपर्यंत ‘सायकल‘ऐवजी ‘मोटारसायकल’ हे निवडणूक चिन्ह द्यावे, अशी मागणी अखिलेश गट करणार असल्याचे विश्नसनीय सूत्रांकडून समजते.
मुलायम सिंग यांनी सोमवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन ‘सायकल’वर आपला दावा केला. अखिलेशची पक्षाध्यक्षपदी निवड झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच बेकायदा व पक्षघटनेच्या विरोधात होती. पक्षात फूट पडलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत सपाचे राखीव निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, यावर मुलायम सिंग यांचा भर होता.
लगोलग मंगळवारी अखिलेश गटातर्फे त्यांचे विश्वासू राम गोपाल यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांची भेट घेऊन ‘सायकल’वर प्रतिदावा केला. के. पी. नंदा, नरेश अगरवाल, अभिषेक मिश्रा आणि अक्षय यादव आदी नेते त्यांच्यासोबत होते. पक्षाचे ९0 टक्के संसद सदस्य व आमदार हे अखिलेश यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा गट हाच खरा समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे राखीव निवडणुक चिन्ह आम्हालाच मिळायला हवे, असे झैदी यांना सांगितल्याचे राम गोपाल यांनी पत्रकारांना सांगितले.
निवडणूक आयोगास या वादाचा निर्णय समाजवादी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करून किंवा दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन घेऊन, अशा दोन्ही प्रकारे करता येईल. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना त्याआधी कदाचित ‘सायकल’चा अंतिम फैसला न होण्याचीही शक्यता आहे. तसे झाले तर वादग्रस्त निवडणूक चिन्ह गोठवून भांडणाऱ्या दोन्ही गटांना हंगामी स्वरूपात स्वतंत्रपणे नवे चिन्ह देण्याचे यापूर्वीचे पायंडे आहेत.
सूत्रांनुसार ही शक्यता लक्षात घेऊनच अखिलेश गटाने ‘सायकल’ गेली तर ‘मोटारसायकल’ मागण्याचे ठरविले आहे. सायकलहून मोटारसायकल हे अधिक वेगवान व आधुनिक वाहन असल्याने त्याद्वारे पक्षाचे काळानुरूप बदललेले नवे रूपडे मतदारांपुढे मांडणे अधिक फायद्याचे ठरेल, असे या मागचे गणित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

नितिशकुमारांचा कानमंत्र
- बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार हे या यादवीत अखिलेशच्या बाजूने उभे राहण्याची चिन्हे आहेत. मध्यंतरी त्यांनी अखिलेशचे तोंडभरून कौतुकही केले होते.
- समाजवादी जातकुळीतील पक्षांची मोट बांधून स्थापन झालेल्या महाआघाडीला ऐनवेळी टांग मारल्याने नितिश कुमार व राजदचे प्रमुख लालुप्रसाद यांचा मुलायम सिंग यांच्यावर मनातून राग आहेच.
- निवडणूक जिंकण्यासाठी काही तरी वेगळे करण्याचा सल्ला देताना नितिश यांनी अखिलेशना बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही दारुबंदी करण्याचा कानमंत्र दिला असल्याचेही समजते.

- अखिलेश यादव यांनी मंगळवारी आपले वडील व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली.
- पक्षाचे नेतृत्व कोणी करावे यावरून मतभेद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली असली तरी अखिलेश यादव यांच्या गटाने त्या बातम्या अतिरंजित असल्याचे म्हटले.

Web Title: If the bike goes motorcycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.