जर पंतप्रधानही अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही वाचवू शकणार नाही : संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:10 AM2021-12-29T08:10:37+5:302021-12-29T08:11:04+5:30
Omicron Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्णंही सापडत आहे. शिवाय देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.
Omicron Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉन विषाणूचे (Coronavirus Omicron Variant) रुग्णंही सापडत आहे. शिवाय देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांचं कठोरपणे पालन करणं आणि काही निर्बंध घालण्याच्याही सूचना केल्यात. तर दुसरीकडे काही राज्यांनी पुन्हा निर्बंध घालण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.
संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनामास्क फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केवळ पंतप्रधान मोदी हे विनामास्क दिसत आहेत. त्यांच्यासोबत असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य अधिकारीवर्गही मास्कमध्ये दिसत आहेत. यावरुन संजय निरुपम यांनी टोला लगावला आहे "हे केवळ टीका करण्यासाठी नागी. पंतप्रधानांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा स्थळांवर मास्क परिधान केलं नाही, तर लोकांवर याचा परिणाम काय होईल. चुका आमच्याकडूनही होत आहेत, परंतु आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय. जर पंतप्रधान अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही आपल्याला वाचवू शकणार नाही," असं संजय निरुपम म्हणाले.
यह महज़ आलोचना के लिए आलोचना नहीं है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 28, 2021
प्रधानमंत्री सार्वजनिक कार्यक्रमों या स्थलों पर मास्क नहीं पहनेंगे तो आम नागरिकों पर क्या असर पड़ेगा?
ग़लतियाँ हमसे भी हो रही हैं और हम सुधारने की कोशिश भी कर रहे हैं।
पर अगर प्रधानमंत्री भी ऐसी गलतियाँ करेंगे तो कोई बूस्टर भी नहीं बचा सकता। pic.twitter.com/5zcZaOgiYv
मोदींनी केलं होतं काळजी घेण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना नववर्षांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. शिवाय १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.