वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमामालिनी
By admin | Published: July 8, 2015 10:20 AM2015-07-08T10:20:26+5:302015-07-08T12:13:38+5:30
त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता व चिमुकलीचे प्राण वाचले असे सांगत हेमामालिनी यांनी अपघातासाठी त्याच कुटुंबाला जबाबदार ठरवले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांनी या अपघातासाठी त्या कुटुंबालाच जबाबदार ठरवले आहे. 'त्या मुलीच्या वडिलांनी जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर एका चिमुरडीचा जीव वाचला असता' असे ट्विट करत हेमामालिनी यांनी अपघाताचे खापर त्या कुटुंबावरच फोडले आहे.
गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे त्यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला तसेच हेमामालिनींसह पाच जखमी झाले. हेमामालिनी यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती सुधारल्यानंतर हेमामालिनी यांनी ट्विटरवरून त्या अपघाताचे खापर मृत मुलीच्या कुटुंबियांवरच फोडले. 'या अपघातात हकनाक जीव गमवावा लागलेल्या त्या चिमुरडीसाठी व अपघातातील जखमींसाठी मला वाईट वाटते. जर त्या चिमुरडीच्या वडिलांवनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघाता टळला असता आणि त्या चिमुकल्या बालिकेचे प्राणही वाचले असते' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारी मीडिया व इतर काही लोकांवरही हेममालिनी यांनी जोरदार टीका केली.
दरम्यान या अपघाताप्रकरणी हेमामालिनी यांच्या कारचालकाविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.