जेवणाचे बिल दिले नाही तर ते मोफत समजा, रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:30 AM2019-01-06T08:30:25+5:302019-01-06T08:30:51+5:30

रेल्वेमंत्र्यांच्या सूचना : रेल्वेस्टेशनवरही लागणार किमतीचे फलक

If food is not paid for bills, think about it free of charge, train suggestions | जेवणाचे बिल दिले नाही तर ते मोफत समजा, रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

जेवणाचे बिल दिले नाही तर ते मोफत समजा, रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

googlenewsNext

नवी दिल्ली : तुम्ही यापुढे लांबच्या प्रवासात रेल्वेतील जेवण घेतले आणि त्याचे बिल रेल्वेच्या कर्मचाऱ्याने तुम्हाला दिले नाही, तर त्या जेवणाचे तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. ते जेवण तुमच्यासाठी मोफत असेल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संबंधित अधिकाºयांच्या बैठकीत तसा निर्णय दिला आहे.

येत्या मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किमतीचे फलक सर्व रेल्वेगाड्या तसेच स्टेशनवर प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने लावले जाणार आहेत. त्यावर खाद्यपदार्थांच्या किमती असतील. त्यामुळे रेल्वे कर्मचारी तुमच्याकडून जादा पैसे घेऊ शकणार नाहीत. शिवाय आणखी एक महत्त्वाची सूचना त्या फलकांवर असेल. ती म्हणजे ‘कृपया कर्मचाºयास टीप देऊ नका. तुम्हाला कर्मचाºयांकडून बिल मिळाले नाही, तर तुमचे जेवण मोफत असेल. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत पीयूष गोयल यांनी प्रवाशांना तक्रार नोंदवता यावी, यासाठी एकच हेल्पलाईन क्रमांक असावा, असे आदेश अधिकाºयांना दिले. आजच्या घडीला देशातील ७२३ रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय सुविधा आहे. लवकरच अशा रेल्वेस्टेशनची संख्या २ हजार करण्यात येईल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

कर्मचाºयांना देणार पीओएस
रेल्वे प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वेगाडीतील के टरिंग स्टाफ व टीटीई यांना पीओएस (पॉइंट आॅफ सेल) यंत्र देण्यात यावे, अशा सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. या यंत्रामध्ये बिले तयार करण्याच्या आणि पेमेंटच्या सोयी असतील. त्यामुळे नेमकी रक्कम देणे प्रवाशांना शक्य होईल. सध्या सर्वाधिक तक्रारी जेवण व खाद्यपदार्थांचा दर्जा व त्यासाठी घेतली जाणारी रक्कम यासंबंधीच्या असतात. त्या दूर व्हाव्यात, असा त्यामागील हेतू असून, खाद्यपदार्थांसंबंधीच्या तक्रारी नोंदविण्याची सोयही मार्चपासून प्रवाशांना मिळू शकेल.

Web Title: If food is not paid for bills, think about it free of charge, train suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.