मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी
By admin | Published: May 8, 2016 11:08 PM2016-05-08T23:08:10+5:302016-05-08T23:08:10+5:30
नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
Next
न िराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.येथून जवळच मूर्दापूर धरण आहे. मूर्दापूर धरणाची उंची वाढवावी, असा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी काम अपूर्णच असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असून एमआयडीसचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाची उंची तीन मिटरने वाढवावी, अशी मागणी गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. धरणाचीपाणी साठवण क्षमता ११० दशलक्ष घनफुट आहे. शेतकर्यांच्या मागणीमुळे शासनाने उंची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात भराव्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र बुडीत क्षेत्रातील जाणार्या शेतीचे भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे. उंची वाढ झाल्यास धरणाची साठवण क्षमता २३९ दशलक्ष घनफुट होणार आहे. त्यामुळे नशिराबादला मुबलक पाणी मिळणार आहे. एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागणार नाही.उंची वाढीमुळे शेतीला पाणीपुरवठा करणार्या विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापूर्वीच वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उंची वाढ व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत करुन ठराव करण्यात आला आहे. विजय भानुदास सरोदे हे सूचक असून सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, अनुमोदक आहे. ग्रामसभेत सर्वांनी या ठरावास सर्वानुमते मंजुरी मिळाली असून लघुपाटबंधारे विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.