त्याच दिवशी संसदेवर चालून गेलो असतो, तर संपूर्ण प्रकरण...; बांगलादेशचा उल्लेख करत हे काय बोलले राकेश टिकैत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 09:59 AM2024-08-21T09:59:00+5:302024-08-21T10:02:03+5:30
टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर...
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले आहे. मेरठमध्ये एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना टिकैत म्हणाले, बांगलादेशात जी व्यक्ती गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे, विरोधीपक्षाचे सर्व नेते कारागृहात बंद आहेत, तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते. असेच येथेही होईल.
टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर..., त्या दिवशी 26 जानेवारी होती, नाही तर, 25 लाख लोक होते. त्याच दिवशी संपूर्ण प्रकरण निकाली निघाले असते. चूक झाली.
एका प्रश्नावर टिकैत हसत म्हणाला, "आता जनतेची तयारी आहे, चिंता करू नका. नक्की होणार. तयार आहोत." टिकैत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणीही केली आहे.
कोलकात्याच्या घटनेवर म्हणाले, सरकारविरोधात कट -
यावेळी राकेश टिकैत यांनी कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, "चुकीचे घडले, कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. देशात कायदा आणि संविधान आहे. बलात्कार आणि हत्या झाली. बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पण, संपूर्ण देशात हायलाइट करणे, सरकारला (ममता सरकार) बदनाम करण्याची योजना तर नाही? बलात्कार आणि हत्या झाली, त्यासाठी देशात कायदा आहे. मात्र, संपूर्ण देशात गेल्या दहा दिवसांपासून तोच मुद्दा उपस्थित करणे, त्यानंतर कुठली बलात्कार आणि हत्या झाली नाही का?" असा सवालही टिकैत यांनी यावेळी केला.