‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 03:39 PM2023-09-05T15:39:11+5:302023-09-05T15:39:44+5:30

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

'If INDIA Aghadi changes its name to India, Modi will be the name of the country...' Kejriwal said | ‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

googlenewsNext

जी-२० देशांची बैठक आणि मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. जी-२० साठी ज्या नेत्यांना राष्ट्रपतींचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून मोदी सरकार देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत करण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही आहे. मी याबाबत केवळी बातम्या ऐकल्या आहेत. आमच्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी आहे त्यामुळे असं केलं जात आहे. जर आघाडीचं नाव इंडिया आहे तर दे देशाचं नाव कसं बदलणार? जर आम्ही भारत आघाडी असं नाव दिलं तर हे भारताचं नाव बदलून इंडिया करणार आहेत का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमचा देश एवढा जुना आहे आणि हे याचं नाव एवढ्यासाठी बदलण्याचा विचार करत आहेत की इंडिया आघाडी या नावामुळे यांना मिळणारी मतं कमी होतील. यामुळेच हे चिडलेले आहेत. तसेच केवळ मुद्दे भरकटवत आहेत. 

इंग्रजीमध्येही देशाचं नाव बदलून भारत करण्याची चर्चा गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटनांमुळे सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी भारताने प्रेसिडेंसी जी-२० ने जी-२० भारत लॉन्च केले आहे. ते जी-२०चं अतिरिक्त एक्स (ट्विटर) अकाउंट असेल. त्यावरून जी-२० शी संबंधित माहिती भारताच्या अधिकृत नावाने प्रसिद्ध केली जाईल.

अन्य एका माहितीनुसार राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी२० डिनरसाठी जे निमंत्रण पत्र पाठवले आहे. ते सुद्धा भारताचे राष्ट्रपती या नावाने पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी सामान्य व्यवहारामध्ये  President of India या नावाचाच वापर केला जात असे. 

Web Title: 'If INDIA Aghadi changes its name to India, Modi will be the name of the country...' Kejriwal said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.