"देशाला ग्लोबल पॉवर बनायचं असेल तर...", आनंद महिंद्रांनी घेतला IPS मनोज शर्मांचा ऑटोग्राफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:45 PM2024-02-07T16:45:05+5:302024-02-07T16:45:37+5:30
महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली
12th Fail या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली... मध्यप्रदेशमधील चंबल गावातून एक तरुण ज्याला IPS म्हणजे काय हेही माहीत नव्हते, पण एका पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून तो प्रेरित झाला आणि त्याने थेट ग्वालियर गाठलं.. पण, नियतिच्या मनात काही वेगळंच होतं... आजीने पेंशनचे साठवलेले पैसेही चोरीला गेले... मग तो तिथून दिल्लीत आणि अनेक अडचणींवर मात देत IPS अधिकारी झाला... मनोज कुमार यांची हा प्रवास जेव्हा रिअल लाईफवरून रिल लाईफवर आला, तेव्हा सर्व चकित झाले. आज महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी IPS अधिकारी मनोज शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांची भेट घेतली.... त्यांनी खास ट्विट केले.
आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ''जेव्हा मी त्यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला, तेव्हा ते लाजले. जे मी तुम्हाला अभिमानाने दाखवत आहे. मनोज कुमार शर्मा, IPS आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी, IRS, हे खरे वास्तविक जीवनातील नायक आहेत. असाधारण जोडपे ज्यांच्या जीवनावर #12thFail हा चित्रपट आधारित आहे. ''
ते पुढे म्हणतात,''आज दुपारच्या जेवणाच्या वेळी, मला कळले की चित्रपटात जे दाखवले गेले हे त्यांच्या वास्तविक जीवनाशी तंतोतंत जुळत आहे आणि ते आजही अखंड सचोटीने जीवन जगण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सराव करत राहतात. भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर अधिकाधिक लोकांनी त्यांच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यास ते अधिक वेगाने होईल. त्यामुळे तेच या देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत. त्यांना भेटल्यामुळे मी आज एक श्रीमंत माणूस आहे.''
They were shy when I requested them for their autographs, which I am proudly holding.
— anand mahindra (@anandmahindra) February 7, 2024
But they are the true real-life heroes Manoj Kumar Sharma, IPS and his wife Shraddha Joshi, IRS. The extraordinary couple on whose lives the movie #12thFail is based.
Over lunch today, I… pic.twitter.com/VJ6xPmcimB
IPS मनोज कुमार शर्मा हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या कुटुंबात त्यांचं पालनपोषण झालं. मनोज कुमार शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पास झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही.
मनोज यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ टेम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा य़ेथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच त्यांना अत्यंत फायद्याचं ठरलं. मनोज कुमार शर्मा UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाले.