काश्मिरमध्ये भारताचा झेंडा जाळला तर त्यात गैर काय? - पप्पू यादव

By admin | Published: March 7, 2016 05:09 PM2016-03-07T17:09:54+5:302016-03-07T17:09:54+5:30

बिहारमधला वादग्रस्त नेता पप्पू यादव यांनी जम्मू व काश्मिरमध्ये भारताचा झेंडा जाळण्यात गैर ते काय असा प्रश्न विचारून नवा वाद निर्माण केला आहे

If the Indian flag is burnt in Kashmir, then what is it? - Pappu Yadav | काश्मिरमध्ये भारताचा झेंडा जाळला तर त्यात गैर काय? - पप्पू यादव

काश्मिरमध्ये भारताचा झेंडा जाळला तर त्यात गैर काय? - पप्पू यादव

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - बिहारमधला वादग्रस्त नेता पप्पू यादव यांनी जम्मू व काश्मिरमध्ये भारताचा झेंडा जाळण्यात गैर ते काय असा प्रश्न विचारून नवा वाद निर्माण केला आहे. यादव यांच्या या टिप्पणीवर भाजपाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. 
पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या पप्पू यादव यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून स्वत:चा पक्ष, राष्ट्रीय जनता दलात प्रवेश, भाजपाशी जवळिक, पत्नी काँग्रेसची खासदार असा सर्वपक्षीय संचार असलेले ते नेते आहेत.
सगळे हिंदू संत राष्ट्रविरोधी असल्याचे विधानही त्यांनी याच भरात केले असून अशा संतांपासून पिळवणूक होऊ द्यायची नसेल तर मंदीरांमध्ये जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Web Title: If the Indian flag is burnt in Kashmir, then what is it? - Pappu Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.