सूचनांची अंमलबजावणी न केल्यास मंगल कार्यालयाचा परवाना रद्द

By Admin | Published: November 28, 2015 11:55 PM2015-11-28T23:55:29+5:302015-11-28T23:55:29+5:30

पोलीस अधीक्षकांचा इशारा : स्वतंत्र पार्किंग व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना

If the information is not implemented then the permission to cancel the permission of the Mangal office | सूचनांची अंमलबजावणी न केल्यास मंगल कार्यालयाचा परवाना रद्द

सूचनांची अंमलबजावणी न केल्यास मंगल कार्यालयाचा परवाना रद्द

googlenewsNext
लीस अधीक्षकांचा इशारा : स्वतंत्र पार्किंग व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना
जळगाव: लग्न सराई सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगल कार्यालय मालकांनी सभागृह व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, सुरक्षा रक्षक नेमावेत, पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा करावी, वाद्य वाजविण्याबाबत पोलीस स्टेशनची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सभागृह ताब्यात देऊ नये आदी सूचनांचे पालन करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मंगलकार्यालयाची नोंदणी रद्द करण्यासह बॅँड चालक व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे.
शहरातील सर्व मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक व बॅँड व्यवस्थापकांची बैठक शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहरचे नवलनाथ तांबे, रामानंदचे प्रवीण वाडीले, तालुक्याचे सूर्यकांत पाटील, जिल्हा पेठचे श्याम तरवाडकर, शनी पेठचे सहायक निरीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. शहरातील विविध रुग्णालय,शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालय आदी परिसर मनपाच्यावतीने शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत याची जाणीव यावेळी करुन देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना
शांतता क्षेत्रात वाद्य, वाजंत्री वाजविल्यास वाद्य सामुग्री जप्त करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. कोणत्याही मंगल कार्यालयात रात्री दहा वाजेनंतर वाद्य वाजता कामा नये तसेच ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करावे. याबाबत संबंधित पोलीस निरीक्षकांनी शांतता क्षेत्राबाबत सूचना कराव्यात असे सुपेकर यांनी बजावले.

Web Title: If the information is not implemented then the permission to cancel the permission of the Mangal office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.