जयललिता असत्या तर छापे पडले नसते

By admin | Published: December 28, 2016 02:33 AM2016-12-28T02:33:42+5:302016-12-28T02:33:42+5:30

आयकर विभागाकडून आपल्या कार्यालयावर मारलेले छापे म्हणजे सचिव कार्यालयावरील घटनात्मक हल्ला आहे, असे सांगतानाच आपण या पदावर कायम आहोत. आपल्याला

If Jayalalitha was there, she would not have raided | जयललिता असत्या तर छापे पडले नसते

जयललिता असत्या तर छापे पडले नसते

Next

चेन्नई : आयकर विभागाकडून आपल्या कार्यालयावर मारलेले छापे म्हणजे सचिव कार्यालयावरील घटनात्मक हल्ला आहे, असे सांगतानाच आपण या पदावर कायम आहोत. आपल्याला कोणतेही आदेश मिळालेले नाहीत, असा दावा हटविण्यात आलेले सचिव पी. राम मोहन राव यांनी केला आहे. जयललिता असत्या, तर असे छापे टाकले असते का? असा सवालही त्यांनी केला.
अटक करण्यात आलेले वाळू माफिया शेखर रेड्डी यांच्याशी आपले कोणतेही संबंध नाहीत, असे सांगून राव म्हणाले की, सर्च वॉरंंटवर आपले नाव नाही. अण्णानगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राव म्हणाले की, या छाप्यात केवळ १ लाख १२ हजार रुपये नगदी रक्कम, ४० ते ५० सोन्याचे सिक्के आणि २० किलो चांदी मिळाली आहे. याच निवासस्थानी मागील आठवड्यात सकाळी छापे मारण्यात आले होते. आपल्याला दोषी ठरविणारे कोणतेही कागदपत्र येथे सापडले नाही. सीआरपीएफने मला नजरबंद केले होते. तामिळनाडूच्या मुख्य सचिव कार्यालयावरील हा घटनात्मक हल्ला आहे. मी मुख्य सचिव होतो आणि आहे. सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की, ते मला बदलीचा आदेश देऊ शकतील. जयललिता यांनी नियुक्त केलेला मी मुख्य सचिव आहे, असेही ते म्हणाले. आयकर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याकडून चौकशीची परवानगी घेतली होती का, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

- तामिळनाडूच्या मुख्य सचिव कार्यालयावरील हा घटनात्मक हल्ला आहे. मी मुख्य सचिव होतो आणि आहे. सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की, ते मला बदलीचा आदेश देऊ शकतील. जयललिता यांनी नियुक्त केलेला मी मुख्य सचिव आहे.

Web Title: If Jayalalitha was there, she would not have raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.