"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 12:32 PM2020-05-31T12:32:05+5:302020-05-31T12:50:59+5:30

दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले.

If Markaz program has been stopped on time this time not come says amit shah SSS | "मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशात या व्हायरसचा धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशातील अनेक राज्यांत पसरले.

मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी अनेक राज्यांत गेल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. यातील काही जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मरकजबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळच आली नसती अशी कबुली अमित शहा यांनी दिली आहे. शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती झाली. यावेळी आयोजित एका विशेष कार्यक्रमात शहा यांनी असं म्हटलं आहे. 

"मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळच आली नसती" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. आजतकच्या ई-अजेंडा या कार्यक्रमात शहा यांनी हे विधान केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडानऊवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे कोरोनाच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे. 

दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारने कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी मरकजच्या कार्यक्रमाला जबाबदार धरले होते. या कार्यक्रमामुळे जवळपास 30 टक्के कोरोना केस संपूर्ण देशात पसरल्याचं म्हटलं जातं. देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा चौथा टप्पा रविवारी 31 मे रोजी संपल्यानंतर देशाभरातील फक्त कोरोनाबाधित ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये येत्या 30 जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ सुरू ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारने शनिवारी जारी केला. ‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार पुन्हा केव्हा व कसे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, तसेच ‘लॉकडाऊन’ नसले तरी कोरोना रोखण्यासाठी यापुढे कोणते निर्बंध सुरू राहतील, याची मार्गदर्शिकाही केंद्राने प्रसिद्ध केली.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5164 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 8,380 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाख 80 हजारांवर पोहोचली असून  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक

CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान

CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी 

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

Web Title: If Markaz program has been stopped on time this time not come says amit shah SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.