मुस्लिमांनी अत्याचार केल्यास मी हिंदूंच्या पाठीशी!

By admin | Published: November 13, 2015 12:09 AM2015-11-13T00:09:07+5:302015-11-13T00:09:07+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकमधील हिंदूंना बुधवारी दिवाळीच्या भेटीदाखल त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले.

If Muslims tortured me, I would support Hindus! | मुस्लिमांनी अत्याचार केल्यास मी हिंदूंच्या पाठीशी!

मुस्लिमांनी अत्याचार केल्यास मी हिंदूंच्या पाठीशी!

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकमधील हिंदूंना बुधवारी दिवाळीच्या भेटीदाखल त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. तुमच्यासोबत काहीही होत असेल आणि अत्याचार करणारा मुस्लीम असेल तर मी हिंदूंच्या पाठीशी उभा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शरीफ यांनी बुधवारी हिंदूंनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमास हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपस्थित हिंदू समुदायास नवाज यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. मी कुण्या एका धर्माचा पंतप्रधान नाही.
माझ्या देशात कुठल्याही धर्म वा समुदायावर अत्याचार होत असेल तर त्याची मदत करणे माझे कर्तव्य आहे. हिंदूंविरुद्ध अत्याचार झाला आणि अत्याचार करणारा मुस्लीम असला तरी त्याच्याविरुद्ध कारवाई होईल. कारण माझा धर्म मला हेच शिकवतो. केवळ इस्लामच नाही तर जगाच्या पाठीवरील सर्व धर्म हीच शिकवण देतात. अत्याचार करणाऱ्याची नाही तर पीडिताची मदत करा, त्याच्या पाठीशी उभे राहा, हेच सर्व धर्म सांगतात, असे शरीफ यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत. तेव्हा शक्य तेवढी एकता निर्माण करा. परस्परांना मदत करा. भेदभाव अल्लालाही मान्य नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: If Muslims tortured me, I would support Hindus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.