रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:10 AM2018-06-04T00:10:22+5:302018-06-04T00:10:22+5:30

रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.

 If the railway gets a letter mark, the promotions of the officials will also be shown | रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

रेल्वेला लेटमार्क लागला तर अधिकाऱ्यांच्या बढतीलाही लेटमार्क

Next

नवी दिल्ली : रेल्वे उशिरा धावण्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे रेल्वेगाड्या वेळेवर धावतील. तसे झाले नाही तर त्याची किमत संबंधित अधिका-याला मोजावी लागेल व ते मोल असेल त्या अधिका-याच्या बढतीला विलंब.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांना यापुढे रेल्वे उशिरा धावल्यास त्यांचे मूल्यमापन त्या प्रमाणात लांबणीवर टाकले जाईल, असे सांगितले. गोयल यांनी अधिकाºयांना वक्तशीरपणे काम करण्यास महिनाभराची मुदत दिली आहे. गेल्या आठवड्यात अंतर्गत बैठकीत गोयल यांनी विभागीय महाव्यवस्थापकांना खडसावले व म्हटले की, रेल्वेगाड्यांच्या उशिरासाठी तुम्ही देखभालीची कारणे पुढे करू शकत नाहीत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

- उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना गोयल यांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या विभागात २९ मेपर्यंत ४९.५९ टक्के एवढीच कार्यक्षमता नोंदवली गेली. गेल्या वर्षी या कालावधीतील कार्यक्षमतेच्या तुलनेत यावेळी ३२.७४ टक्के घट झाली.

- गोयल यांच्या भडिमाराला अधिकाºयाला तोंड
द्यावे लागले तरी मंत्र्यांना हा विलंब मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणामुळे झाल्याचे व त्याचा फटका अधिकाºयाला बसला असल्याचे
माहीत होते.

- रेल्वेगाड्या वेळेवर धावण्याचे आकडे अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. विभाग त्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठी देखभालीची कारणे पुढे करतात हे स्पष्ट
आहे, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत गोयल यांनी प्रत्येक विभागीय प्रमुखाला व्यक्तिश: बोलावून घेतले व अत्यंत कमी गाड्या वेळेवर का धावल्या याचे स्पष्टीकरण मागितले.

Web Title:  If the railway gets a letter mark, the promotions of the officials will also be shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे