दुरुस्ती न केल्यास शाळेला ठोकणार ताळे
By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:56+5:302015-08-20T22:09:56+5:30
चौगाव ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारा
Next
च गाव ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारानाशिक : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गटातील चौगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मोडकळीस आली असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या धोकादायक शाळेतच विद्यार्थी शिक्षण घेत असून, काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत चौगाव येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काल (दि.२०) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन प्राथमिक शाळेचे निर्लेखन होऊन शाळेची दुरुस्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.काल जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चौगावच्या शिष्टमंडळाने सुखदेव बनकर यांना निवेदन देऊन चौगावची प्राथमिक शाळा दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली. चौगाव जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाच खोल्यांची असून, ती अत्यंत धोकादायक झाली असून, मोडकळीस आली आहे. शाळा निर्लेखनाचा प्रस्ताव संबंधित विभागास सादर केला असूनही शाळा निर्लेखित होत नसून काही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सदरची शाळा तातडीने निर्लेखित करून नवीन पाच शाळा खोल्यांना मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. शिष्टमंडळात चौगावचे सरपंच लताबाई शेवाळे, उपसरपंच अनिता शेवाळे तसेच शंकर शेवाळे, विशाल गांगुर्डे, मंगला मांडवडे, लक्ष्मण मांडवडे, रानूबाई पवार, आत्माराम पवार, ग्रामसेवक एन. एम. शेख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)