शिवजींची इच्छा असेल तर पुन्हा अमरनाथ यात्रेला जाईन- सलीम
By admin | Published: July 12, 2017 12:04 PM2017-07-12T12:04:54+5:302017-07-12T12:04:54+5:30
भगवान शिवजींच्या मनात असेल तर मी पुन्हा अमरनाथला जाईन, असं सलीमने सांगितलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 12- अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंवर सोमवारी रात्री हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मंगळवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणारा बसड्रायव्हर प्रकाशझोतात आला. सलीम शेख या बस चालकाने दाखविलेलं प्रसंगावधान अगदी सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. दहशतवाद्यांनी ज्या बसवर गोळीबार केला त्या बसचा ड्रायव्हर असलेल्या सलीमने धाडसाने ५० लोकांचं जीव वाचवले. या घटनेनंतर "अहमदाबाद मिरर" या वृत्तपत्राने ने सलीमशी बातचित केली आहे. यामध्ये सलीमने घटनास्थळाचा अनुभव सांगितला आहे. मला भारतीय असण्यावर अभिमान आहे आणि भगवान शिवजींच्या मनात असेल तर मी पुन्हा अमरनाथला जाईन, असं सलीमने सांगितलं आहे.
मी खूप हैराण आहे, मला घटनेमुळे धक्का बसला आहे आणि मी दु:खीही आहे. मंगळवारी दिवसभर मी दहशतवादी हल्ल्याबद्दल राजकीय नेत्यांची वक्तव्य ऐकत होतो. मला राजकारण कळत नाही. पण बसमधल्या सगळ्या प्रवाशांचे जीव मी वाचवू शकलो नाही, याचं मला दु:ख आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात भाविकांचे जीव मी वाचवू शकलो नाही याची मला आयुष्यभर खंत राहील.पण पन्नास पेक्षा जास्त लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी पोहचविल्याचं समाधानही मला आहे. जी लोकं हल्ल्यात किरकोळ जखमी झाले होते ते नंतर माझ्याकडे येऊन मला धन्यवाद देत होते. पण मी त्यांना द्यायला माझ्याकडे काहीही उत्तर नव्हतं, कारण तिथे फक्त सगळीकडे रक्त आणि मृत्यूचं तांडव होतं. मला इतका मोठा धक्का बसला होता की जवळपास दीड तासाने मला आजूबाजूला काय घडतं आहे ते समजलं.
आणखी वाचा
झिम्बाब्वेने केलेला पराभव जिव्हारी, मॅथ्यूजचा कर्णधारपदाचा राजीनामा
रवी शास्त्रींवर नियंत्रण ठेवण्यासाठी झहीर, राहुल द्रविडची निवड ?
सूरत एअरपोर्टवर पोहचल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी मला भेटले होते तेव्हा माझ्या नावाची शिफारस शौर्यपुरस्कारासाठी करणार असल्याचं मला समजलं. खरंतर शौर्य पुरस्काराचं खरं श्रेय तर हर्षभाईंना जातं आहे. हर्षभाई तेव्हा क्लिनरच्या सीटवर बसले होते. त्यांनीच मला सांगितलं, की गाडी न थांबवता वेगाने पुढे घेऊन जा. त्याच्या सल्ल्यानंतर गोळीबार सुरू असताना मी बसमध्ये खाली झुकून बसलो पण बसचं स्टीअरिंग माझ्या हातात होतो. बस कुठे चालली आहे याची जराही कल्पना मला नव्हती. याचदरम्यान हर्षभाईला गोळ्या लागल्या. मी जर बसमध्ये खाली झुकलो नसतो तर त्या गोळ्या मलाही लागल्या असत्या, असं सलीमने म्हंटलं आहे.