डिसेंबरअखेर कर न भरल्यास २ टक्के शास्ती

By admin | Published: December 10, 2015 11:57 PM2015-12-10T23:57:21+5:302015-12-10T23:57:21+5:30

महत्त्वाच्या सिंगल्स

If the tax is not filled by December 2 percent of the penalty | डिसेंबरअखेर कर न भरल्यास २ टक्के शास्ती

डिसेंबरअखेर कर न भरल्यास २ टक्के शास्ती

Next
त्त्वाच्या सिंगल्स
डिसेंबर अखेर कर न भरल्यास २ टक्के शास्ती
जळगाव : मनपाने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मोहीम तीव्र केली असून शासन निर्णयानुसार डिसेंबरअखेरपर्यंत मालमत्ताकर न भरल्यास २ टक्के शास्ती लागणार आहे. मनपातर्फे रिक्षावर लाऊडस्पीकर लावून नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. तसेच २६व २७ रोजी शनिवार व रविवार असूनही प्रभाग समिती कार्यालये कर वसुलीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करून कारवाई टाळण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मनपाला ५ कोटींचा निधी प्राप्त
जळगाव : मनपाने ५ कोटींचा हिस्सा भरण्याची तयारी दर्शविल्याने शासनाकडून ५ कोटींचा विकासनिधी प्राप्त झाला आहे. या १० कोटींच्या निधीतून विविध प्रभागांमधील विकासकामे प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासकामांसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाकडून हा निधी मिळाल्याने काही प्रमाणात विकासकामे करणे शक्य होणार आहे.
शौचालय अनुदानाबाबतचा प्रस्ताव महापौरांकडून परत
जळगाव : मनपा प्रशासनाने १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून शासन निर्णयानुसार वैयक्तिक शौचालयांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यात त्रुटी असल्याने महापौरांनी हा प्रस्ताव परत पाठविला. त्यामुळे उपायुक्तांनी गुरुवारी सायंकाळी तातडीने सर्व प्रभाग अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा केली. शौचालयाचे काम सुरू करण्यासाठी ६हजार रुपये व काम पूर्ण झाल्यावर ६ हजार रुपये निधी दिल्यानंतर ती यादी व खर्चाची माहिती सादर केल्यावर ५ हजार रुपये १४व्या वित्तआयोगाच्या निधीतून देण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.

Web Title: If the tax is not filled by December 2 percent of the penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.