786 आकड्यांची नोट असेल तर चांदीच चांदी; दिवाळीआधी बनाल लखपती
By हेमंत बावकर | Published: November 2, 2020 05:19 PM2020-11-02T17:19:41+5:302020-11-02T17:20:28+5:30
Lottery : काही जणांकडे सहा शतकांपूर्वीची नाणी आहेत. अनेकांना जुन्या नोटा, वेगवेगळ्या सिरीजच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. तो छंद लखपतीही बनवू शकतो.
जर तुमच्याकडे नोटा आणि नाण्यांचे मोठे कलेक्शन असेल तर तुम्ही खूप लकी ठरणार आहात. तुम्ही या दिवाळीत लखपती बनू शकणार आहात. तुमच्याकडील नोटांमध्ये जर 786 बंनर सिरीजची नोट असेल तर तुम्ही 3 लाखांपर्यंत रक्कम जिंकू शकता. यासाठी तुम्हाला ई-बे (ebay) वेबसाईटवर जावे लागणार आहे. यावर तुम्हाला नोटेच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत.
ई-बे वर कशी बोली लावली जाते?
ई-बे वेबसाईटवर एनक गोष्टींची बोली लावली जाते. येथे चलनातील नोटांचीही बोली लागते. य़ा बोलीमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. ज्याच्याकडे 786 नंबरची नोट आहे त्याला या बोलीमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. 786 नंबरला खूप महत्व आहे. अमिताभच्या कुली सिनेमामध्ये 786 नंबरचा बिल्ला प्रत्येकाला आठवणीत असेल. हा त्यांचा लकी नंबर आहे.
1951 मध्ये छापलेली नोट 1 लाखांत
जर तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी नोट आहे आणि ती 1951 मध्ये छापलेली असेलत तर तिला लाखात किंमत आहे. ही नोट पांढऱ्या आणि फेंट निळ्या रंगात आहे. जर ही नोट तुमच्याकडे असेल तर तिला 1 लाख रुपयांची किंमत मिळेल. खूप जुन्या नोटा असल्याने या नोटा दुर्मिळ असल्याचे मानले जाते.
किती जुनी नाणी संग्रहीत
अमरावतीच्या एका प्रतिष्ठित कुटुंबाकडे इतिहासकालीन नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली ही पारंपरिक वडिलोपार्जित नाणी फक्त लक्ष्मीपूजनालाच बाहेर काढली जातात. अन्य वेळी ही नाणी तिजोरीत बंद असतात. यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. या मिनारच्या चारही बाजूला अरबी भाषेतील मजकूर आहे. परंतु, शहरात अरबी भाषा कोणालाही अवगत नसल्याने या लिखाणाचा अर्थ कळू शकला नाही.
त्यांच्याकडील एकूण १६ नाण्यांमध्ये निजामशाहीतील एका नाण्यासह दोन नाणी १८४० मधील व्हिक्टोरिया राणीचा ठसा असलेली आहेत. एक नाणे १८८२ मधील इंडियन पोर्तुगिज रुपयाचे आहे. आठ नाणी १९१३, १९४४, १९४७ ची ब्रिटिशकालीन जॉर्ज फोर्थ, जॉर्ज फिप्थ यांच्या कार्यकाळातील एक रुपयाची चांदीची नाणी आहेत. तसेच सन १९३९, १९४३, १९४४ मधील आठआणे, एक आणा अशी ऐतिहासिक नाणी आहेत. ही नाणी वडिलोपार्जित पूजेत असल्यामुळे अद्यापही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.