गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण, माझी बदनामी झाली तर हरकत नाही पण...- हार्दिक पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:17 PM2017-11-13T22:17:23+5:302017-11-13T22:21:05+5:30

पाटीदार नेता हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित सेक्स व्हिडिओ समोर आल्यानंतर गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

If there is defamation politics in Gujarat, I do not mind but ... - Hardik Patel | गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण, माझी बदनामी झाली तर हरकत नाही पण...- हार्दिक पटेल

गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण, माझी बदनामी झाली तर हरकत नाही पण...- हार्दिक पटेल

Next

अहमदाबाद - पाटीदार नेता हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित सेक्स व्हिडिओ समोर आल्यानंतर गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले आहे. या व्हिडिओमागे भाजपचा हात असून गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे. 

हार्दिक पटेलनं ट्विट करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. टीव्हीवर दाखवण्यात येत असल्याच्या व्हिडिओमध्ये जर मी असतो तर मी छातीठोकपणे स्वीकारले असते. परंतु गुजरातमध्ये आता घाणेरडे राजकारण केले जात आहे. माझी बदनामी केली तरी मला फरक पडत नाही. परंतु गुजरातमधील महिलांचा अपमान केला जात आहे, असं हार्दिकनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



 



 

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  ''मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या''. दरम्यान, सीडीबाबतची माहिती कशी समजली, असा प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला तेव्हा हेच भाजपाचं वैशिष्ट्य आहे, असे त्याने म्हटले होते. 

Web Title: If there is defamation politics in Gujarat, I do not mind but ... - Hardik Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.